Agricultural : पिकांवरील संकट टळले आता जनावरांना धोका, ‘लम्पी’ रोगाने पुन्हा डोके वर काढले..! नेमकी उपाययोजना काय?

सर्वात प्रथम लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊच नये या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा लागणार आहे. गोठ्यामध्ये कपारी नसायला पाहिजेत त्यामुळे गोमाशी आणि माशांचे प्रजोत्पादन होणार नाही. तसेच मंडळाच्या ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लम्पी या संसर्गज्यन आजारावरील लस ही उपलब्ध आहे.

Agricultural : पिकांवरील संकट टळले आता जनावरांना धोका, 'लम्पी' रोगाने पुन्हा डोके वर काढले..! नेमकी उपाययोजना काय?
लम्पी संसर्गजन्य आजार
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 3:31 PM

वाशिम : हंगामाच्या सुरवातीपासूनच (Kharif Season) खरिपातील पिके धोक्यात आहेत. आता कुठे पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ होत आहे. त्यामुळे खरिपावरील संकट टळले असले तरी राज्यातील अहमदनगर, जळगाव, धुळे, अकोला पाठोपाठ आता वाशिम जिल्ह्यामध्येही जनावरांना (Outbreak of Lumpy Disease) लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुशंगाने (Department of Animal Husbandry) पशुसंवर्धन विभागाकडून उपापययोजना राबवण्यास सुरवात झाली आहे. मात्र, ‘लम्पी’ हा संसर्गजन्य रोग असल्याने कमी कालावधीत अधिक जनावरांना त्याची लागण होते. यामुळे (Animal) जनावरे दगावली जात नाही पण रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून योग्य ती उपाययोजना ही गरजेची आहे. याबरोबरच गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या पालघरमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. लम्पी त्वचा रोग जनावरातील विषाणूजन्य आजार आहे.

लम्पी रोगाची लक्षणे अन् परिणाम काय?

लम्पी हा एक त्वचा रोग असून त्याचा संसर्ग झपाट्याने होतो. जनावरांना लम्पी रोग होण्याचे कारणही तसेच आहे. जनावरांच्या गोठ्यातील गोचिड, माश्या, टिक्स यांच्या मार्फत या लम्पी आजाराची लागण होते. यामुळे जनावरास ताप येतो तर जनावराच्या डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होऊन दुध उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे लसीकरण हा उत्तम पर्याय असून पशूसंवर्धन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत सहभाग नोदवून लस देणे गरजेचे आहे.

काय आहे उपाययोजना?

सर्वात प्रथम लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊच नये या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा लागणार आहे. गोठ्यामध्ये कपारी नसायला पाहिजेत त्यामुळे गोमाशी आणि माशांचे प्रजोत्पादन होणार नाही. तसेच मंडळाच्या ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लम्पी या संसर्गज्यन आजारावरील लस ही उपलब्ध आहे. शेतरकऱ्यांना कोणत्याही कादगत्राशिवाय मोफत ही लस दिली जाते. गोठ्यामध्ये माशा, गोमाश्या, गोचिड हे वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. शिवाय एखाद्या जनावरास हा आजार झाल्यास सुमारे 5 किमीपर्यंत लसीकरण मोहिम राबवली जाते. त्यासाठी पशूसंवर्धन विभागाला माहिती देणे गरजेचे आहे.

या जिल्ह्यांमध्ये वाढला धोका

लम्पी रोगाचा धोका हा पावसाळ्यातच वाढतो. या दरम्यानच्या काळात जनावरांचे गोठे अस्वच्छ असतात. शिवाय सततच्या पावसामुळे ते स्वच्छ करणेही शक्य होत नाही. त्यामुळे सध्या या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. विशेषत: अहमदनगर, जळगाव, धुळे व अकोला या जिल्ह्यात पाळीव जनावरांना लम्पी स्कीन डिसीसचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तर पालघर जिल्ह्यामध्येही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावराच्या गोठ्यात 20 टक्के इथर व क्लोरोफार्म, 1 टक्के फॉर्मलिन, 2 टक्के फिनॉल, आयोडिन जंतनाशके 1:3 प्रमाणात पाण्यामध्ये मिसळून फवारणी करण्यात यावी असल्या सूचना पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या आहेत.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.