Paddy Crop : काय सांगता..? धान खरेदीचेही होणार चित्रीकरण,पणन संघाचा निर्णय कुणाच्या पत्त्यावर..!

भंडारा जिल्ह्यात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. वाढीव उत्पादनामुळे कमी भाव मिळू नये म्हणून विदर्भात पणन महासंघाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरु केले जातात. एवढेच नाहीतर प्रत्येक खरेदी केंद्राला उद्दिष्ट हे ठरवून दिले जाते. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील खरेदी केंद्रासाठी 6 लाख क्विंटलचे उद्दिष्ट ठरवून दिले होते.

Paddy Crop : काय सांगता..? धान खरेदीचेही होणार चित्रीकरण,पणन संघाचा निर्णय कुणाच्या पत्त्यावर..!
खरेदी केंद्रावर साठा केलेले धान पीकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 2:31 PM

भंडारा : (Bhandara District) भंडारा जिल्ह्यातील (Paddy Crop) धान खरेदीचा घोटाळा हा राज्यात चर्चेचा विषय बनला होता. कारण जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र चालकांनी पराक्रमच तसा केला होता. अवघ्या 6 तासांमध्ये 6 लाख क्विंटल धानाची खरेदी दाखवण्यात आली होती. त्यामुळे (Panan Federation) पणनं महासंघानेही आश्चर्य व्यक्त केले होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु केलेल्या या खरेदी केंद्राचा नेमका फायदा कुणाला हे जाणून घेण्यासाठी आणि कारभारात तत्परता येण्यासाठी आता धानाच्या खरेदीचे चित्रीकरण केले जाणार आहे. याबाबत पणन महासंघाच्या सरव्यवस्थापकानेच तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे बदललेल्या नियमावलीचा फायदा हा धान उत्पादक शेतकऱ्यांना होईल आणि व्यापाऱ्यांचा वाढत हस्तक्षेप त्याला आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

धान खरेदीत नेमके काय झाले?

भंडारा जिल्ह्यात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. वाढीव उत्पादनामुळे कमी भाव मिळू नये म्हणून विदर्भात पणन महासंघाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरु केले जातात. एवढेच नाहीतर प्रत्येक खरेदी केंद्राला उद्दिष्ट हे ठरवून दिले जाते. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील खरेदी केंद्रासाठी 6 लाख क्विंटलचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. मात्र, जिल्ह्यातील खरेदी केंद्रांनी हे उद्दिष्ट केवळ 6 तासांमध्येच पूर्ण केले. त्यामुळे धान खरेदीवर पीक नेमके शेतकऱ्यांचे की व्यापाऱ्यांचे हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे नियमावलीत बदल करण्यात आला आहे.

धान खरेदीमध्ये घोटाळा

एकाच दिवसांमध्ये 6 लाख क्विंटल धानाची खरेदी कशी ? असा सवाल उपस्थित झाला होता. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या प्रकरणाची चौकशीही झाली. यामध्ये खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा नव्हे तर व्यापाऱ्यांचाच माल आल्याचे समोर आले होते. संबंधित उद्दिष्ट हे 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करायचे होते पण 7 जुलै याच दिवशी संपूर्ण खरेदी झाल्याचे दाखवण्यात आले होते. याबाबत अद्यापपर्यंत कुणावर कारावाई झाली नसली तरी पणन महासंघाने नियामावलीतच बदल केला आहे. आता धानाची खरेदी ही चित्रीकरणातच होणार आहे.

हे सुद्धा वाचा

रब्बी हंगामापासून बदलणार चित्र

रब्बी हंगामात धानाची किती खरेदी करायची याचे उद्दिष्ट जिल्ह्याला ठरवून देण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यातून पणन महासंघ हा 5 लाख 92 हजार 380 क्विंटलची धान खरेदी करणार आहे. शिवाय ही खरेदी 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. किमान यंदा तरी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी पणन महासंघाने घेतली आहे. पणन महासंघाचे सरव्यवस्थापक जिल्हा पणन अधिकाऱ्यांना एक पत्र पाठविले असून त्यात धान खरेदीचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते जतन करून ठेवण्याबाबत सर्व धान खरेदी केंद्रांना आदेश दिले आहे. उद्दिष्टाच्या मर्यादेत आणि ऑनलाइन पोर्टलद्वारे खरेदी करावी असेही यात म्हटले आहे त्यामुळे अनियमिततेला आळा बसेल असा विश्वास पणन महासंघाला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.