जून महिना संपला तरी पाऊस नाही, पपईवर रोगांचा प्रादुर्भाव, 6 एकर बागेवर शेतकऱ्याचा कोयता

जून महिना संपला तरी पाऊस नाही तर दुसरीकडे पपईवर येणाऱ्या रोगांनी शेतकरी त्रस्त आहे. यामुळे नंदूरबारच्या एका शेतकऱ्याने 6 एकरवरील पपईच्या बागेवर कोयता चालवला. (Papaya Damage Due To Outbreaks of diseases In nandurbar)

जून महिना संपला तरी पाऊस नाही, पपईवर रोगांचा प्रादुर्भाव, 6 एकर बागेवर शेतकऱ्याचा कोयता
सहा एकर पपई बागेवर शेतकऱ्याचा कोयता
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 9:39 AM

नंदूरबार :  जून महिना संपला तरी पाऊस नाही तर दुसरीकडे पपईवर येणाऱ्या रोगांनी शेतकरी त्रस्त आहे. यामुळे नंदूरबारच्या एका शेतकऱ्याने 6 एकरवरील पपईच्या बागेवर कोयता चालवला. वासुदेव महादेव पाटील असं पपईच्या बागेवर कोयता चालवलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. (Papaya Damage Due To Outbreaks of diseases In nandurbar)

पपईची बाग काढून टाकण्याची वेळ

नंदुरबार जिल्ह्यात संपूर्ण जून महिना कोरडाठाक गेल्याने त्रस्त असलेल्या बळीराजाला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांची गत दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे. उन्हाळ्यात लागवड केलेल्या पपई बागांवर रोग आल्याने पपईच्या बागा काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

शहादा तालुक्यातील रायखेड शिवारातील शेतकरी वासुदेव महादेव पाटील यांनी पपई पिकावर मोझाईक रोग आल्यामुळे आपल्या 6 एकर क्षेत्रातील पपई कापून फेकून दिली आहे. दरवर्षी पपई पिकावर नवीन नवीन रोग येत असतात. या रोगांवर महागडी औषधे फवारणी करून देखील त्याचा फायदा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागतं.

मोझाईक रोगाचा प्रादुर्भाव

वासुदेव पाटील यांनी एप्रिल महिन्यात साडे पाच हजार रोपांची लागवड केली होती. रोपांना जगण्यासाठी रासायनिक खतांबरोबर इतर खर्च केला होता. परंतु तीन महिन्यानंतरही पपई पिकांवर मोझाईक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने टाकलेला पैसा परत निघतांना दिसत नसल्याने शेतकऱ्यांने संतापून पपईची झाडं कापून टाकली.

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली जात असून दरवर्षी येणाऱ्या विविध रोगांमुळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीत असतो. कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या वतीने पपईवर येणाऱ्या लोकांवर वेळी संशोधन होणे गरजेचे असल्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

(Papaya Damage Due To Outbreaks of diseases In nandurbar)

हे ही वाचा :

जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण किती राहणार? भारतीय हवामान विभागानं काय सांगितलं?

Weather Update: पावसात खंड पडल्यानं उष्णता, आर्द्रता वाढल्यानं नागरिक त्रस्त, विदर्भात जून महिन्यात किती पाऊस?

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.