ठरलं तर मग, व्यापारी अन् शेतकऱ्यांच्या बैठकीत पपई दराचा निर्णय, टिकणार की मोडणार..!

| Updated on: Mar 02, 2022 | 12:13 PM

शेतीमालाचे उत्पादन, झालेला खर्च आणि यातून मिळणारा फायदा याचा सर्व विचार करुन आता विक्रीपूर्वीच स्थानिक पातळीवर दर हे निश्चित केले जात आहेत. यापुर्वी नाशिक, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये द्राक्षांचे दर ठरविण्यात आले होते. त्यानंतर आता पपईबाबतही असेच निर्णय होत आहेत. खानदेशात पपईचे क्षेत्र जास्त आहे. मात्र, दर निश्चित नसल्यामुळे पपई क्षेत्रात काळाच्या ओघात घट होत आहे.

ठरलं तर मग, व्यापारी अन् शेतकऱ्यांच्या बैठकीत पपई दराचा निर्णय, टिकणार की मोडणार..!
Follow us on

नंदूरबार : शेतीमालाचे उत्पादन, झालेला खर्च आणि यातून मिळणारा फायदा याचा सर्व विचार करुन आता विक्रीपूर्वीच स्थानिक पातळीवर दर हे निश्चित केले जात आहेत. यापुर्वी नाशिक, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये द्राक्षांचे दर ठरविण्यात आले होते. त्यानंतर आता (Papaya Rate) पपईबाबतही असेच निर्णय होत आहेत. (Khandesh) खानदेशात पपईचे क्षेत्र जास्त आहे. मात्र, दर निश्चित नसल्यामुळे पपई क्षेत्रात काळाच्या ओघात घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यापारी पपईला दर देत नसल्याने (Traders) व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या बैठकी निष्फळ ठरत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी पपई तोड बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पंधरा दिवसानंतर शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी बाजार समिती आणि व्यापारी तसेच शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक झाली असून यामध्ये यात पपई दरासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे चार तास चाललेल्या बैठकीत पहिला पपईला 6 रुपये 41 पैसे किलोचा दर सर्वसंमतीने ठरविण्यात आला आहे. त्यामुळे ठरलेला दरच मिळणार की यामध्ये पुन्हा की वाद निर्माण होणार होणार हे पहावे लागणार आहे.

आता होणार तोड सुरु

पपईचे दर निश्चित होत नसल्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून पपईची तोड ही बंद होती. अखेर शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये बाजार समिती प्रशासनाने मध्यस्ती केल्याने तोडगा निघालेला आहे. गेल्या 15 दिवसांपासून एकमतच होत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शिवाय सध्या पपईच्या मागणीत वाढ होत असल्याने व्यापऱ्यांनीही नरमाईची भूमिका घेत बैठकीत तोडगा काढला आहे. मध्यंतरीही अशाच बैठका झाल्या होत्या पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांचेही नुकसान होत होते. अखेर बाजार समितीने पुढाकार घेतल्याने बैठक पार पडली असून 4 तास सुरु असलेल्या बैठकीला शेतकरी संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

कशामुळे घेण्यात आला होता निर्णय?

हमीभाव केंद्रावर जसे शेतीमालाचे दर निश्चित केले जातात अगदी त्याप्रमाणेच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बाजारपेठेत दर निश्चित करण्यात आले होते. पपईला सुरवातीपासूनच कमीचा दर आहे. असे असताना दराचा कायम तिढा असल्याने बाजार समिती प्रशासनाने शेतकरी आणि खरेदीदार यांना घेऊन बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये खरेदीदार यांच्या म्हणण्यानुसारच दर ठरविण्यात आला. मात्र, आवक जास्त झाली की, खरेदीदार हे मनमानी कारभार करीत पाडून मागणी करतात. त्यामुळे बैठक होऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न हे कायम होते. पण आता सर्वानुमते निर्णय झाल्याने पपई तोड होणार आहे.

दोन्ही बाजूंचे नुकसान टळले

गेल्या 15 दिवसांपासून पपई तोडच बंद असल्याने माल झाडावरच लगडलेला होता. शिवाय तोडणीला आलेल्या पपईची वेळेत तोड न झाल्यामुळे नासधूस होत होती. तर दुसरीकडे मागणी असून व्यापाऱ्यांना पुरवठा करणे शक्य नव्हते कारण एकट्या नंदूरबार जिल्ह्यामध्ये 7 हजार हेक्टरावर पपईची लागवड आहे यामध्ये सर्वाधिक क्षेत्र शहादा तालुक्यात व्यापलेले आहे. आता 6 रुपये 41 पैसे प्रतिकोलोचा दर ठरला असून त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

विलासराव देशमुख अभय योजनेमुळे थकबाकीदार वीज ग्राहकांना मिळणार ‘उर्जा’, नेमका फायदा काय?

PM Kisan Yojna : दोन विभागांमध्ये धूसफूस लाखो शेतकरी लाभापासून वंचित, योजनेतही राजकारण?

धरण उशाला अन् कोरड घशाला : उजनी जलाशयालगतच्या केळी बागा जमिनदोस्त, नेमके कारण काय?