मत्स्यपालन ठरेल आर्थिक कमाईचा राजमार्ग, पेंग्बा मासे विक्रीतून एक व्यक्ती 45 लाखांची उलाढाल करतेय

भारतातील लोकसंख्येचा एक मोठा घटक मत्स्यपालन किंवा मत्स्यव्यवसाय करतो. Fish Farming Business

मत्स्यपालन ठरेल आर्थिक कमाईचा राजमार्ग, पेंग्बा मासे विक्रीतून एक व्यक्ती 45 लाखांची उलाढाल करतेय
मत्सपालन
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 6:55 PM

नवी दिल्ली: भारतातील लोकसंख्येचा एक मोठा घटक मत्स्यपालन किंवा मत्स्यव्यवसाय करतो. मत्स्यपालन हेच त्यांच्या उपजीविकेचा महत्वाचा स्तोत आहे. मत्स्यपालन करणारे काही लोक विशिष्ट प्रकारच्या माशांचे पालन करुन आर्थिक कमाई करतात. वेगळ्या प्रकारच्या माशांचे पालन केल्यानं मत्स्यपालन करणाऱ्या इतर शेतकऱ्यांपेक्षा चांगले पैसे कमवत आहेत. पेंग्बा फिश या प्रजातीच्या माशांचं पालन करुन चांगली कमाई करता येऊ शकते. ( Pegmba Fish Farming Business you can make good income with this check here all details)

पेंग्बा माशाला पूर्वीच्या काळी राजे आणि सम्राटांकडून मागणी होती. इतरांसाठी पेंग्बा माशाचे मत्स्यपालन करण्यास मनाई होती. आता बरेच लोक पेंग्बा प्रजातीच्या माशांचे मत्स्यपालन करतात. त्यातून त्यांना चांगला नफा मिळतो आहे. पेंग्बा मत्स्यपालनाद्वारे अनेकांनी आर्थिक कमाई केली आहे.

मुंबईत राहायचे सूरचंद्रा

मणिपूरच्या साईबम सुरचंद्रा हे पेंग्बा माशाचे पालन करतात. सुरचंद्रा मत्स्यपालनातून चांगली कमाई करत आहेत. नागालँड, आसाम, मिझोरम आणि त्रिपुरा यासारख्या राज्यांमध्ये साईबम सुरचंद्रा मासे पाठवतात. पूर्वी सुरचंद्रा मुंबईत राहत होता, परंतु मणिपूर येथे आला आणि 11 हेक्टरमध्ये मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरु केला. आता सुरचंद्रा आपल्या व्यवसायातून खेड्यातील बर्‍याच लोकांना रोजगार देत आहे.

40 ते 45 लाखांची उलाढाल

सुरचंद्रा हे मत्स्यपालनाद्वारे 40-45 मेट्रिक टन मासे उत्पादित करतात. या उत्पादनाद्वारे त्यांची 40-45 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. आता ते 35 हजार किलोपेक्षा जास्त माशांचं उत्पादन घेतात. सुरचंद्रा यांच्या कामाचा संपूर्ण राज्यातील मच्छीमारांना त्याचा फायदा होत आहे.

पेंग्बा माशांची मागणी वाढत आहे आणि इतर लोकही या व्यवसायात पुढे येत आहेत. आपण देखील पेंग्बा माशाच्या मत्स्यपालनाविषयी माहिती मिळवू शकता आणि पेंग्बा मत्स्यपालनास सुरुवात करु शकता. पूर्वेकडील राज्यांमध्ये पेंग्बा माशांची चांगल्या दरात विक्री करु शकता. तथापि, यासाठी आपल्याला माहिती एकत्रित करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या:

ओरिजनल हापूस कसा ओळखणार? कोकणातील बागायतदारांचा मॉडर्न फंडा, प्रत्येक आंब्यावर क्युआर कोड

मंत्रिमंडळ बैठकीत युरिया खतासंदर्भात मोठा निर्णय, थेट शेतकऱ्यांना मिळणार लाभ

राज्यात लॉकडाऊन लागणार, बियाणे, खताच्या दुकानाचं काय?; शेतमाल शेतातच पडून राहणार का ?

(Pegmba Fish Farming Business you can make good income with this check here all details)

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.