Rabi Season : ढगाळ वातावरणामुळे खर्चही वाढला अन् शेतकऱ्यांची चिंताही, काय आहे उपापयोजना?
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा त्रास होण्यास सुरवात होते. अगदी तसाच काहीसा प्रकार रब्बी हंगामातील पिकांबाबत झालेला आहे. थंडी ही रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसाठी पोषक मानली जाते. मात्र, गेल्या तीन दिवासांपासून वाढलेला गारठा आणि ढगाळ वातावरणाचा प्रतिकूल परिणाम पिकांवर होत आहे.
नांदेड : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा त्रास होण्यास सुरवात होते. अगदी तसाच काहीसा प्रकार (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांबाबत झालेला आहे. (Winter) थंडी ही रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसाठी पोषक मानली जाते. मात्र, गेल्या तीन दिवासांपासून वाढलेला गारठा आणि ढगाळ वातावरणाचा प्रतिकूल परिणाम पिकांवर होत आहे. यामुळे फुलगळती, ( pest control)अळीचा प्रादुर्भाव, मर रोग एवढेच नाही तर पिकांची वाढच खुंटली असल्याने शेतकरी त्रस्त आहे. खरिपापाठोपाठ आता रब्बी हंगामाचे भवितव्य काय राहणार या चिंतेत नांदेडसह हिंगोली, लातूर जिल्ह्यातील शेतकरी आहेत.
काय आहे उपाययोजना?
हरभरा फुलोऱ्यात असताना निंबोळी अर्क, ॲझाडिरॅक्टिन 5 मि.लि प्रति लिटर, एचएएनपीव्ही 500 एलई हे किंवा 1 मिलि प्रति लिटर किंवा क्विनॉलफॉस 2 मि.लि पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे तर अशाच पध्दतीने दुसरी फवारणी इमामेक्टीन बेंझोएट 0.3 ग्रॅम किंवा क्लोरॅण्ट्रानिलिप्रोल 0.25 मिलि, फ्ल्यूबेंडायअमाइड 0.5 मिलि किंवा बिव्हेरिया बॅसियाना 6 ग्रॅम याचे मिश्रण 1 लिटर पाण्यात मिसळून ही 15 दिवसाच्या अंतराने करावी लागणार आहे.
असे करा मर रोगाचे व्यवस्थापन
मर रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी शेताजवळ, बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा, कोरडे तण, सुकलेले लाकूड आधी हवेच्या प्रवाहाच्या उलट दिशेलापेटवून धूर करावा. त्यात दगडी कोळसा टाकून धूर व उष्णता रात्रभर राहील असे पाहावे. ज्या दिवशी धुके पडण्याची शक्यता असेल त्या दिवशी पाण्यात विरघळणाऱ्या गंधक पावडरीची 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करणे महत्वाचे आहे.
खर्चात वाढ, पिकाचे भवितव्य अंधारात
गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात नेहमी बदल झालेला आहे. सकाळ-संध्याकाळ थंडी तर दिवसभर ऊन असे पोषक वातावरण असताना आता दिवसभर ढगाळ वातावरण आणि सकाळ-संध्याकाळ थंडीचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा या पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये वाढ झालेली आहे. एकीकडे उत्पादनात घट होत असताना वाढत असलेला खर्च ही चिंतेची बाब आहे. यापूर्वी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान हे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झाले तर आता ढगाळ वातावरणाचा धोका रब्बी हंगामातील पिकांवर कायम आहे.
हरभरा फुलोऱ्यात असतानाच तीन वेळी फवारण्या
यंदा रब्बी हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा या पिकाचा पेरा झालेला आहे. उत्पादनाची सर्व मदाक आता याच पिकावर आहे. दोन महिन्यापूर्वी पेरणी झालेला हरभरा आता फुलोऱ्यात आला आहे. असे असताना शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन वेळा औषध फावरणी करावी लागलेली आहे. उत्पादन पदरी पडेपर्यंतच अधिकचा खर्च होतो पण वातावरणातील बदलामुळे उत्पादन मिळेलच असे नाही. यापूर्वी खरिपात जे झाले तीच स्थिती रब्बी हंगामाची होऊ नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
संबंधित बातम्या :
Winter Season: थंडीमध्ये जनावरांना 5 आजारांचा धोका, काय आहे उपाययोजना?
PM KISAN : 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांचा सन्मान, योजनेचा लाभ मिळाला नसेल तर असा अर्ज..!
Video | गायीकडून दूध जास्त मिळावं म्हणून या शेतकऱ्यांनं केलेला जुगाड ‘सुपर से भी ऊपर’ आहे!