Banana : हमी पीक झाले बेभरवश्याचे, केळीवर कीडीचा प्रादुर्भाव अन् विम्यासाठी शेतकऱ्यांची परवड

उत्पादन वाढीसाठी मराठवाड्यातील शेतकरी हा फळबागांकडे वळला आहे. मात्र, यावरही धोक्याची घंटा कायम आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील शेतकऱ्यांचे केळी हे हुकमाचे पीक. आतापर्यंत पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पदनात वाढही झाली होती.

Banana : हमी पीक झाले बेभरवश्याचे, केळीवर कीडीचा प्रादुर्भाव अन् विम्यासाठी शेतकऱ्यांची परवड
वातावरणाकील बदलामुळे हिंगोली जिल्ह्यातील केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 10:19 AM

हिंगोली : संकटे आली की, चोही बाजूने येतात असाच प्रकार यंदा शेतकऱ्यांबाबतीत घडलेला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान तर झालेच पण रब्बी हंगामातील पिकांच्या आशाही वातावरणातील बदलामुळे धुसर झाल्या आहेत. उत्पादन वाढीसाठी मराठवाड्यातील शेतकरी हा फळबागांकडे वळला आहे. मात्र, यावरही धोक्याची घंटा कायम आहे. (Hingoli) हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील शेतकऱ्यांचे केळी हे हुकमाचे पीक. आतापर्यंत पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पदनात वाढही झाली होती. यंदा मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. (Climate Change) वातावरणातील बदलामुळे केळीवर (Pest Outbreak) करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर होणारच आहे पण गेल्या तीन वर्षापासून केळी पिकांचा विमाही शेतऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या हमी असलेल्या पिक लोप पावते की काय अशी अवस्था जिल्ह्यात झाली आहे.

उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांचा प्रयोग

परंपारिपक पिकांमधून उत्पादनात वाढ होत नाही म्हणून आता मराठवाड्यातील शेतकरी हे फळबागाकडे आकर्षित होत आहे. शिवाय पोषक वातावरण आणि जोपासणा केली तर उत्पादन निश्चित असेच मानले जाते. पण गेल्या तीन वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा आणि पीक विमा कंपनीचा मनमानी कारभार एकाच वेळी सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. सततच्या नुकसानीमुळे आता परंपारिक पिकेच चांगली अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अधिकचा खर्च करुनही सर्वकाही बेभरवश्याचे असल्याने पुन्हा परंपारिक पिकांचे क्षेत्र वाढणार अशीच अवस्था आहे.

करपा रोगाने केळी उध्वस्त

वातावरणातील बदलाचा परिणाम हा सर्वच पिकांवर झालेला आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यात अवकाळी आणि ढगाळ वातावरण यामुळे कांद्यासह केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. केळीच्या बुडापासूनच हा रोग पसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नेमके काय करावे असा प्रश्न आहे. केळीची पाने ही करपून जात आहेत तर याचा परिणाम आता उत्पादनावर होणार आहे. वसमत तालुक्यात हजोरो हेक्टवर केळीचे लागवड करण्यात आली होती. पण आता बागा अंतिम टप्प्यात असताना होणारे नुकसान शेतकऱ्यांना उघड्या डोळ्याने पहावे लागत आहे.

उत्पन्नापेक्षा उत्पादनावर अधिकचा खर्च

प्रतिकूल वातावरणामुळे केळी बागांचे नुकसान तर झालेच आहे पण सध्या दरातही मोठी घसरण झाली आहे. 400 ते 500 रुपये क्विंटल असा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे अधिकचा खर्च करुन तोडणी आणि वाहतूकही शेतकऱ्यांना परवडत नाही अशी अवस्था बांधावरची आहे. त्यामुळे किमान गेल्या तीन वर्षापासून रखडलेला विमा तरी शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. उत्पादनवाढीसाठी केलेला बागेचा प्रयोग आता पुढे भविष्यात राहतो की नाही अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

संबंधित बातम्या :

काळ्या मिरचीची गोष्टच न्यारी लागवड सोपी अन् उत्पादन भारी, तीन महिन्यांमध्ये शेतकरी मालामाल

POCRA : ‘पोकरा’चे रखडलेले अनुदान थेट खात्यामध्ये, पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Onion: बाजार समितीच्या एका निर्णयाने कांदा उत्पादकांचा प्रश्न मिटला, आवक सुरुच उलट दरात सुधारणा

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.