Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळीच्या नुकसान खुणा, 1 एकरावरील कांद्याचाही प्रयोग फसला, शेतकऱ्याने थेट रोटावेटरच फिरवला

अवकाळी पावसाने उघडीप देऊन 15 दिवसांचा कालावधी लोटला असला तरी यामुळे निर्माण झालेली संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. नाशिक जिल्ह्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. शिवाय बाजारपेठही जवळच असल्याने शेतकरी हे नगदी पिक म्हणून कांद्यावर भर देतात. असाच प्रयोग येवला तालुक्यातील बल्हेगावच्या भाऊसाहेब सोमासे यांनी केला मात्र, अवकाळीनंतर बदललेल्या वातावरणामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता.

अवकाळीच्या नुकसान खुणा, 1 एकरावरील कांद्याचाही प्रयोग फसला, शेतकऱ्याने थेट रोटावेटरच फिरवला
करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने येवला तालुक्यातील शेतकऱ्याने रोटावेटरच्या सहायाने कांदा पिक काढून बांधावर फेकले आहे.
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 12:38 PM

लासलगाव : (untimely rains) अवकाळी पावसाने उघडीप देऊन 15 दिवसांचा कालावधी लोटला असला तरी यामुळे निर्माण झालेली संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. (Nashik) नाशिक जिल्ह्यात (Onion crop) कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. शिवाय बाजारपेठही जवळच असल्याने शेतकरी हे नगदी पिक म्हणून कांद्यावर भर देतात. असाच प्रयोग येवला तालुक्यातील बल्हेगावच्या भाऊसाहेब सोमासे यांनी केला मात्र, अवकाळीनंतर (change in environment) बदललेल्या वातावरणामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होऊ लागल्याने सोमासे यांनी थेट कांदा पिकावर रोटरच फिरवला. त्यामुळे भविष्यातील नुकसान तरी टळेल आणि रब्बी हंगामातील इतर पिक घेता येईल म्हणून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कांदा पिकावर करपा अन् मावा रोगाचा प्रादुर्भाव

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पावसाने उघडीप दिली असली तरी वातावरणातील बदलामुळे कांदा पिकावर करपा आणि मावा रोग वाढलेला आहे. याच्यावर नियंत्रण केले जात आहे. पण लागवडीपासून 60 हजाराचा खर्च आणि भविष्यातही औषध फवारणी, देखरेख यावर खर्च होणारच त्यामुळे अधिकचा खर्च न करता थेट कांदा पिकच वावरातून बाहेर काढण्याचा निर्णय सोमासे यांनी घेतला. सध्या रब्बी हंगामातील कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पण बदलत्या वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे कांदा जोपासायचे मोठे अवाहन शेतकऱ्यांसमोर आहे.

एकरी 60 हजाराचा खर्च पुन्हा काढणीची भर…

शेती मशागतीपासून ते रोपांची खरेदी आणि लागण या दरम्यान, भाऊसाहेब सोमासे यांना 60 हजार रुपये मोजावे लागले होते. मात्र, कांदा हे नगदी पिक असून त्याची जोपासना योग्य केली तर त्यापासून चार पैसे मिळतील ही अपेक्षा सोमासे यांना होती. मात्र, निसर्गाचा लहरीपणा यंदा सर्वच पिकांवर बेतत आहे. त्यामधून कांद्याची तरी कशी सुटका होईल. त्यामुळेच त्यांनी उभ्या पिकात थेट रोटर फिरवून हे क्षेत्र रब्बी हंगामातील पिकासाठी रिकामे केले आहे. येवला तालुक्यातील कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

कांद्यावर फवारणी गरजेची

ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा कांदा पीकावर होत आहे. रब्बी हंगामातील कांदा लागवड करुन काही दिवसाचाच कालावधी लोटलेला आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे. शिवाय धुईचे प्रमाणही वाढत असल्याने कांद्याचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे ही फवारणी त्वरीत करण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या :

Sugar Factory : ऊसगाळप वेगाने, ‘एफआरपी’ चे वाटप मात्र, धिम्या गतीने, कारखान्यांचा मधला मार्ग आला ‘कामी’

जिनिंग उद्योगावरही ओमिक्रॅानचा परिणाम, राज्यात निम्म्याच क्षमतेने कापूस गाठींचे उत्पादन

जातीवंत देशी गोवंशसाठी कृषी विद्यापीठाचा अनोखा प्रयोग ? कशी होते भ्रुण प्रात्यारोपण प्रक्रिया

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.