ब्राह्मीची लागवड करा आणि मिळवा अधिक नफा, कमी खर्च आणि मेहनतीमध्ये जास्त फायदा

स्मृती वाढविण्यात ब्राह्मी फार उपयोगी ठरतात. याशिवाय संधिवात, कर्करोग, अशक्तपणा, दमा आणि मूत्रपिंडासारख्या आजारांच्या उपचारांमध्येही याचा उपयोग होतो. त्याचा रस थंड तेलाच्या उत्पादनातही वापरला जातो. (Planting brahmi is beneficial for farmers, know everything)

ब्राह्मीची लागवड करा आणि मिळवा अधिक नफा, कमी खर्च आणि मेहनतीमध्ये जास्त फायदा
ब्राम्हीची लागवड करा आणि मिळवा अधिक नफा
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 4:58 PM

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. पारंपरिक पिकांसह नगदी पिके घेण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. यामुळेच औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. उत्पादन कमी असल्याने त्यांची मागणी कायम राहते व शेतमालाला चांगला भाव मिळतो. औषधी वनस्पतींची लागवड ही आज मोठ्या संख्येने शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचे स्रोत बनली आहे. कमी खर्च आणि मेहनतीमुळे ब्राह्मी हा शेतऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय बनला आहे. स्मृती वाढविण्यात ब्राह्मी फार उपयोगी ठरतात. याशिवाय संधिवात, कर्करोग, अशक्तपणा, दमा आणि मूत्रपिंडासारख्या आजारांच्या उपचारांमध्येही याचा उपयोग होतो. त्याचा रस थंड तेलाच्या उत्पादनातही वापरला जातो. (Planting brahmi is beneficial for farmers, know everything)

ब्राह्मीच्या लागवडीसाठी पावसाळ्याचा हंगाम योग्य

भारतातील बहुतेक सर्व राज्यांमध्ये याची लागवड केली जाते. दलदलीची जमीन यासाठी सर्वात योग्य मानली जाते. त्याची झाडे तलाव, नदी आणि कालव्याच्या किनाऱ्यावरही वाढतात. ब्राह्मीची लागवड भाताप्रमाणे केली जाते. प्रथम रोपवाटिका तयार केली जाते आणि त्यानंतर हे शेतात लावले जाते. पावसाळा याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य हंगाम मानला जातो. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांना त्याची लागवड करायची आहे, त्यांनी आतापासून तयारी सुरु करावी.

एका पीकातून तीन ते चार उत्पादन मिळू शकते

ब्राह्मीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकदा लावणी केल्यानंतर याची तीन ते चार वेळा कापणी केली जाते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा नफा मोठ्या प्रमाणात वाढतो. लावणीनंतर प्रथम कापणी तीन महिन्यांनंतर होते. आपण एका पीकातून तीन ते चार वेळा उत्पन्न घेऊ शकता.

पावडर विकून कमवा अधिक पैसे

ब्राह्मीची लागवड करणारे शेतकरी सांगतात की, एक हेक्टरमध्ये 25 ते 30 क्विंटल ब्राह्मीची कोरडे पाने वाढतात. आपण थेट बाजारात देखील विक्री करू शकता. परंतु अधिक नफा मिळविण्यासाठी भुकटी बनवूनही शेतकरी ते विकतात. त्याचबरोबर काही कंपन्या या वनस्पतीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांशी करार देखील करतात. जर आपण स्वतः शेती करीत असाल तर आपण देशाच्या निरनिराळ्या बाजारात ते विकू शकता. (Planting brahmi is beneficial for farmers, know everything)

इतर बातम्या

Cyclone Tauktae Tracker and Updates : रत्नागिरीत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागात वीजपुरवठा खंडित

Tauktae Cyclone: चक्रीवादळ राज्यात धडकणार नाही, पण समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग वाढणार, सावध राहण्याच्या सूचना

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.