देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीएम किसान सम्मान निधीचा 18 वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात विधानसभेचे पडघम वाजत असताना ही आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. राज्यात दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यातच आता पीएम किसानचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेत दरवर्षी 6000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येतात. 2000 रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम जमा करण्यात येते. आतापर्यंत या योजनेतंर्गत 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत.
आतापर्यंत 34,000 रुपये जमा
पीएम किसान योजनेतंर्गत 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचा प्रतिक्षा आहे. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र शासनाने 34,000 रुपये दिले आहेत. तर पुढील हप्ता, पीएम किसानचा 18 वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामाच्या अगोदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची योजना आहे.
पीएम किसानचा 18 वा हप्ता केव्हा?
पीएम किसान योजनेसंबंधीच्या साईटवर उपलब्ध माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर, 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जमा करतील. येत्या 5 ऑक्टोबर रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. रब्बी हंगामात शेती कामासाठी लागणाऱ्या खर्चासाठी हा निधी उपयोगी ठरू शकतो.
तुमचे नाव यादीत आहे का?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल. तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल.
pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.
ई-केवायसी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पैसा येईल.
असे करा eKYC
ओटीपी आधारे करा ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल ऐपवर उपलब्ध)
बायोमेट्रिक आधारे ई-केवायसी तुम्ही CSC Center/ SSK वरुन करु शकता
फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी, मोबाईल ऐपवर उपलब्ध आहे.