PM-kisan: किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम एप्रिलमध्ये मिळणार, आतापर्यंत किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ?

केंद्र सरकारकडून एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाण्याची शक्यता आहे. PM Kisan Samman scheme

PM-kisan: किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम एप्रिलमध्ये मिळणार, आतापर्यंत किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 2:46 PM

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाण्याची शक्यता आहे. सरकारनं निर्धारित केलेल्या संख्येसाठी 2.74 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी होणं बाकी आहे. केंद्र सरकारकडून 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये पाठवले जाण्याची शक्यता आहे. आठव्या हप्त्याची रक्कम येण्यापूर्वी सातव्या हप्त्याची रक्कम किती शेतकऱ्यांना मिळाली हे माहिती असणं आवश्यक आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार डिसेंबर 2020 ते मार्च दरम्यान 9 कोटी 75 लाख 45 हजार 326 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. (PM Kisan Samman scheme 8th instalment credited soon know how many farmers gate advantage of this scheme)

11.76 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी

केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.66 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. केंद्र सरकारचा 14.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 11.76 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झालीय.

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी सुरु

पीएम किसान सन्मान योजनेमध्ये नोंदणी केली नसल्यास नोंदणी करण्याची संधी आहे. देशभरातील 2.74 कोटी शेतकरी नोंदणी करु शकतात. नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करता येईल. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक वर्षात 6 हजार रुपये पाठवले जातात.

ऑनलाईन नोंदणी कशी करायची?

स्टेप 1: पीएम-किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in)जावा. स्टेप 2: तिथे Farmer Corner वर क्लिक करा स्टेप 3: पुढे NEW FARMER REGISTRATIONवर क्लिक करा. स्टेप 4: यानंतर पुढील पेज ओपन होईल तिथे आधार कार्ड आणि कॅप्चा टाकून पडताळणी करा स्टेप 5:  यानंतर पुढे जा वर क्लिक करा स्टेप 6:  पुढे अर्ज ओपन होईल त्यातील माहिती भरा स्टेप 7: अर्जातील संपूर्ण माहिती बरोबर भरा आणि नोंदणी करा.

पीएम किसान योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही

केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Ministry of Agriculture) पीएम किसान योजनेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या माहिती असणं आवश्यक आहे. सरकारी अधिकाऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही मात्र, केंद्र आणि राज्य सरकार मधील मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/ड श्रेणीतील कर्मचारी यासाठी पात्र आहेत. चुकीची माहिती भरुन योजनेचा लाभ घेतल्या आधार पडताळणीमध्ये सरकारला ती बाब समजू शकते त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावा. त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

(1) संविधानिक पदावर असणारा किंवा मंत्री असणारा शेतकरी (2) नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, विधानपरीषद आमदार, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य (3) केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकारी (4) प्राप्तिकर भरणारे शेतकरी (5) 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे शेतकरी (6) डॉक्टर, इंजिनिअर, सीए, वकिल

आपल्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासणार?

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे आले का हे तुम्ही सहजपणे तपासू शकता तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील…. सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल. होमपेजवर किसान कॉर्नवर जा. तिथे स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका. त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांच्या डोळ्यांमधील अश्रू पुसणार, चारही महिने बरसणार

शेतकऱ्यांसाठी अलर्ट! 31 मार्चपूर्वी करा या दोन गोष्टी अन्यथा नुकसान होईल

(PM Kisan Samman scheme 8th instalment credited soon know how many farmers gate advantage of this scheme)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.