PM Kisan Samman Nidhi योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात, तुमचं रेकॉर्ड तपासलं का?

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम 10 एप्रिलाच्या सुमारास पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. PM Kisan Samman scheme

PM Kisan Samman Nidhi योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात, तुमचं रेकॉर्ड तपासलं का?
शेतकर्‍यांच्या हिताचे मोठे पाऊल उचलून सरकारने केसीसीमधील व्याज दरामध्ये 2019 मध्ये पशुधन आणि मच्छीमारांसह दुग्ध उद्योगांना आर्थिक मदत देण्याची तरतूद केली. किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना 1998 मध्ये सुरू केली गेली. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार सहजपणे शेतीसाठी कर्ज मिळते. या क्रेडिट कार्डच्या प्रमाणात, शेतकरी आपला शेतीमाल, खते, बियाणे, कीटकनाशके विकत घेऊ शकतात.
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 10:41 AM

PM Kisan Samman Nidhi Scheme नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम 10 एप्रिलाच्या सुमारास पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. पीएम-किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत सात हप्त्यांमध्ये 14 हजार रुपये मिळाले आहेत. आठव्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवले जाणार आहेत. किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत 11.66 कोटी शेतकऱ्यांना 1.15 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या रेकॉर्डमध्ये अडचण असल्यास दुरुस्ती करणं आवश्यक आहे. (PM Kisan Samman scheme 8th instalment two thousand rupees credited in farmers account in April 2021 check your record)

11.66 कोटी शेतकऱ्यांना फायदा

केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.66 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. शेतकऱ्यांना या योजनेनुसार 1.15 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत. आठव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या रेकॉर्डमध्ये काही दुरुस्ती असेल तर करुन घ्यावी लागणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जातात. पहिला हप्ता डिसेंबर ते मार्च, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै आणि तिसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान जारी केला जातो. पीएम किसान सन्मान योजनेसाठी देशातील 11.66 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांच्या रेकॉर्डमध्ये अडचणी असल्यामुळे त्यांना मदत मिळत नाही. जर सर्व शेतकऱ्यांचं रेकॉर्ड दुरुस्त केले तर सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळू शकतात.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची रक्कम 25 डिसेंबर 2020 पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा 1 डिसेंबर 31 ते मार्च या कालावधीत दिला जातो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात तिसऱ्या हप्त्याचा लाभ 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मिळतो.

तुमचं रेकॉर्ड कसं तपासणार?

  1. सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
  2. तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
  3. होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
  4. जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आणि आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल तर आधार नंबर चुकीचा असल्याची माहिती तिथे मिळेल.
  5. फार्मर किंवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
  6. पीएम किसान पोर्टलवर सरकारनं शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. तिथे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर याचा वापर करता येईल.
  7. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, त्यांची यादी राज्य, जिल्हा तालुका, गाव, कॅटेगरी सिलेक्ट करुन पाहू शकता.

आपल्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासणार?

  1. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे आले का हे तुम्ही सहजपणे तपासू शकता
  2. तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील….
  3. सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
  4. तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
  5. होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
  6. तिथे स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा
  7. त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
  8. त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल.

संबंधित बातम्या :

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून 2000 रुपये जमा होणार, यादीतील तुमचं नाव आजच चेक करा!

PM Kisan Scheme : 12 वाजता तुमच्या खात्यात पैसे पडणार, पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे लक्ष

(PM Kisan Samman scheme 8th instalment two thousand rupees credited in farmers account in April 2021 check your record)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.