PM Kisan e-KYC: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता घरबसल्या करता येणार मोबाईवरुन ‘ई-केवायसी’ ची प्रक्रिया, जाणून घ्या सर्वकाही

सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, यासाठी कृषी मंत्रालय प्रयत्नशील आहे. त्यासाठी सीएससी सेंटर्सच्या माध्यमातून एक मोहीमही सुरू करण्यात आली, जिथे अधिकाधिक पीएम किसान ई-केवायसीची सोय करण्यात आली. कृषी मंत्रालयाकडून जनजागृती मोहीम राबवून शेतकऱ्यांना ईकेवायसी करण्यास सांगितले जात आहे.

PM Kisan e-KYC: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता घरबसल्या करता येणार मोबाईवरुन 'ई-केवायसी' ची प्रक्रिया, जाणून घ्या सर्वकाही
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 5:47 AM

मुंबई : पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आता शेतकऱ्यांसाठी विविध सोई-सुविधा (Central Government) सरकारकडून केल्या जात आहे. आता (Pm kisan Yojna) पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC हे अनिवार्य केले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया नेमकी करायची कशी असा सवाल उपस्थित होता. शिवाय मध्यंतरी तांत्रिक अडचणीमुळे मोबाईलवरील ही (Agricultural Department) कृषी मंत्रालयाकडून सुविधा बंद करण्यात आली होती. मात्र, पुन्हा ही सेवा पुर्ववत करुन शेतकऱ्यांसाठी अधिक सोईचे झाले आहे. 11 व्या हप्त्यासाठी e-KYC हे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा हा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार नाही.याच कारणामुळे सरकारने 2 वेळा अंतिम तारीख वाढवली आहे.पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, आधार ओटीपीच्या माध्यमातून ईकेवायसीची सुविधा पूर्ववत करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाइलवरून हे काम आधार ओटीपीच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे ईकेवायसी करून घ्यावे लागत होते.

शेतकऱ्याच्या हाती महिन्याचा कालावधी

सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, यासाठी कृषी मंत्रालय प्रयत्नशील आहे. त्यासाठी सीएससी सेंटर्सच्या माध्यमातून एक मोहीमही सुरू करण्यात आली, जिथे अधिकाधिक पीएम किसान ई-केवायसीची सोय करण्यात आली. कृषी मंत्रालयाकडून जनजागृती मोहीम राबवून शेतकऱ्यांना ईकेवायसी करण्यास सांगितले जात आहे. असे असतानाही अनेकांनी ई-केवायसी हे करुन घेतलेले नाही. याचमुळे 2 वेळा मुदत वाढविण्यात आली होती. पीएम किसानचा 10 वा हप्ता रिलीज होण्यापूर्वी म्हणजेच 1 जानेवारी 2022 पूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया सुरू झाली होती. नंतर काही तांत्रिक अडचणीमुळे ही सुविधा काही दिवस थांबवावी लागली. जेव्हा ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली, तेव्हा अंतिम तारीख 31 मार्च निश्चित करण्यात आली, जी नंतर 22 मे 2022 पर्यंत वाढविण्यात आली. पुन्हा एकदा कृषी मंत्रालयाकडून ईकेवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आणि शेतकऱ्यांना या कामासाठी 31 मे 2022 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना प्रतिक्षा 11 व्या हप्त्याची

या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता त्यांना प्रतीक्षा आहे ती 11 व्या हप्त्याची. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. प्रत्येकी चार महिने दोन हजार रुपये अशा तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात. या योजनेंतर्गत देशभरातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

असे करा मोबाईलवरुन ‘ई-केवायसी’

मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी प्रथम Google वरुन krushukranti.com या वेबसाईटवर जावे लागणार आहे. यामध्ये सर्वात शेवटी pmkisan Yojna आणि e-KYC असे दोन पर्याय आहेत. त्यापैकी E-KYC हा पर्याय निवडायचा आहे. यामध्ये pmkisan Yojna असा आशयाचे पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या उजव्या बाजूच्या Image मधील अक्षरे रिकाम्या जागी भरायची आहेत. त्यांनतर सर्च करायचे आहे . यामध्ये तुम्हाला अणखीन एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. यानंतर Get OTP यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर 4 अंकी OTP नंबर येईल. तो OTP या बॉक्समध्ये टाकायचा आहे.त्यानंतर Submit For Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर वरती e-KYC is Success असा SMS येईल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.