Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Central Government : आता घर बसल्या मिळतील पीएम किसान योजनेतील पैसे, बॅंकेत जाण्याच्या त्रासातूनही मुक्तता

स्पाइस मनी पोर्टल हे देशभरातील विशेषत: ग्रामीण भागातील बॅंकिंग आणि वित्तीय सेवा बाबतच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याबाबत कंपनीचे स्पाइस मनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार म्हणाले की, पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला की, 18,500 पिन कोडवर कंपनीचे तब्बल 10 लाख अधिकारी हे काम करीत होते.

Central Government : आता घर बसल्या मिळतील पीएम किसान योजनेतील पैसे, बॅंकेत जाण्याच्या त्रासातूनही मुक्तता
पीएम किसान योजना
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 5:49 PM

मुंबई :  (PM Kisan Scheme) पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या सोई सुविधेसाठी जेवढे बदल करता येतील तेवढे (Central Government) केंद्र सरकराच्या माध्यमातून केले जात आहेत. आतापर्यंत योजनेत सहभागी होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन घेतला जात होता. त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होत असून आता योजनेतील पैसे आणण्यासाठी शेतकऱ्यांना आता बॅंकेत जाण्याचीही गरज भासणार नाही. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 2 हजार रुपये जमा केले जातात. आता ही रक्कम स्पाइस मनी या मोबाईल अॅपद्वारे काढताही येणार आहे. स्पाइस मनी ही एक ग्रामीण फिटनेक कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशात राहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरापर्यंत (AEPS) एईपीएसद्वारे अनुदानाची रक्कम काढून देण्यास मदत करणार आहे. केंद्र सरकारची पीएम किसान योजना ही 100 टक्के आधारिक केंद्रीय क्षेत्र योजना आहे. याची सुरवात 1 डिसेंबर 2018 साली सुरु करण्यात आली होती. यामध्ये भूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना वर्षभरात 6 हजार रुपये हे तीन हप्त्यामध्ये खात्यामध्ये वर्ग केली जाते.

असे मिळणार घरी बसून योजनेचे पैसे

स्पाइस मनी पोर्टल हे देशभरातील विशेषत: ग्रामीण भागातील बॅंकिंग आणि वित्तीय सेवा बाबतच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याबाबत कंपनीचे स्पाइस मनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार म्हणाले की, पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला की, 18,500 पिन कोडवर कंपनीचे तब्बल 10 लाख अधिकारी हे काम करीत होते. ज्यामुळे 10 कोटी लाभार्थ्यांना हे योजनेतील रक्कम सहज उपलब्ध होणार आहे आणि काढून घेण्यासही मदत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना बॅंकेपर्यंतही जाण्याची गरज भासणार नाही. पैशाची गरज निर्माण झाल्यास स्पाइस मनीचे अधिकारी क्युआर कोडचे माध्यमातून तुमच्या खात्यामधील पैसे वर्ग करुन घेतील आणि रोख स्वरुपात ते तुम्हाला देतील. त्यामुळे गरजेच्या वेळी पैसे असूनही त्याचा उपयोग नाही असे होणार नाही. तर गरजेच्या वेळी एईपीएसच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांचे पैसे काढण्यास मदत करण्यासाठी खेड्यांमध्ये उपस्थित असणार आहेत. ही पध्दत सुरक्षित असून शेतकऱ्यांच्या फायद्याची राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

स्पाइस मनी देशातील दुर्गम भागातही उपलब्ध

केवळ शहरी भागातच नाहीतर देशभरातील ग्रामीण भागातही स्पाइस मनी हे उपलब्ध आहे. देशातील 700 जिल्ह्यामध्ये आणि 5 हजार ब्लॉकमध्ये ही कंपनी आर्थिक सेवा पुरवित आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना मिळणार असून लाभार्थ्यांना त्यांचे पैसे जागेवर मिळणार आहे.यामुळे भारतीय बॅंकींग क्षेत्रामध्ये क्रांती घडून येणार असल्याचा विश्वास आहे. केंद्र सरकारने देशभरातील 10 कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. 11 हप्त्यासाठी 1 एप्रिलपासून अर्ज करणारे वैध असणार आहेत त्यांना जुलैपर्यंत केव्हाही त्याचा लाभ घेता येणार आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.