Potato Production: बटाट्याचे पीक जमिनीतच नाहीतर जमिनीच्यावरही, कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट

कृषी संशोधन परिषदेच्या या संशोधनामुळे केवळ बटाटा उत्पादन हवेतच होणार नाही तर यावर रोगराईचा प्रादुर्भावही नसेल अशी माहिती देण्यात आली आहे. बटाटा उत्पादनात एरोपोनिक तंत्रज्ञानामुळे देशातील अनेक भागातील शेतकऱ्यांना बटाट्याची उपलब्धता उपलब्ध झाली आहे. बुधवारी मध्य प्रदेशच्या फलोत्पादन विभागाला या तंत्रज्ञानाला परवाना देण्यासाठी करार करण्यात आला आहे.

Potato Production: बटाट्याचे पीक जमिनीतच नाहीतर जमिनीच्यावरही, कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट
कृषी संशोधन परिषदेच्या संशोधनामुळे आता जमिनीच्यावरही बटाट्याचे उत्पादन घेता येणार आहे.
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 6:10 AM

मुंबई : ऐकावे नवलच…आता बटाट्याची लागण कुठे असते असे विचारले तर शेतीशी संबंध नसणारा व्यक्तीही (Potato) बटाटे हे जमिनीतच पीकत असल्याचे सांगेल. पण तुम्हाला जर कोणी आता बटाट्याचे उत्पादन जमिनीत नाही तर जमिनीवर घेतले जाणार असे म्हणल्यावर त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोनच बदलेल. पण हे खरे आहे आता बटाटे हे जमिनीवर पिकणार आहे. विशेष म्हणजे अशा पध्दतीने उत्पादित बटाट्यावर कोणत्याही (Outbreak of disease) रोगराईचा प्रादुर्भाव होणार नाही. मध्य प्रदेश सरकारने बुधवारी नवी दिल्लीतील (Central Potato Research) केंद्रीय बटाटा संशोधन संस्था, शिमला या संस्थेशी अॅरोपोनिक पद्धतीने विषाणूजन्य आजारविरहित बटाटा बियाणे तयार करण्याचा करार केला. भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत येणाऱ्या या संस्थेने बटाट्याच्या बिया हवेत तयार करण्याचे हे अनोखे तंत्र विकसित केले आहे.या संदर्भात आयसीएआरच्या संस्थांकडून आपापल्या क्षेत्रात नवे कृषी तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. ज्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाला परवानगी

कृषी संशोधन परिषदेच्या या संशोधनामुळे केवळ बटाटा उत्पादन हवेतच होणार नाही तर यावर रोगराईचा प्रादुर्भावही नसेल अशी माहिती देण्यात आली आहे. बटाटा उत्पादनात एरोपोनिक तंत्रज्ञानामुळे देशातील अनेक भागातील शेतकऱ्यांना बटाट्याची उपलब्धता उपलब्ध झाली आहे. बुधवारी मध्य प्रदेशच्या फलोत्पादन विभागाला या तंत्रज्ञानाला परवाना देण्यासाठी करार करण्यात आला आहे.वीन तंत्रज्ञानामुळे बटाट्याच्या बियाण्यांची गरज लक्षणीयरीत्या पूर्ण होईल. त्यामुळे देशात बटाट्याचे उत्पादन वाढेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री यांनी व्यक्त केला आहे.

मध्य प्रदेशात सर्वाधिक बटाट्याचे उत्पादन

मध्य प्रदेशात बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. वाढत्या उत्पादनाला आता या संशोधनाचा फायदा होणार आहे. यामुळे उत्पादन तर वाढणार आहेच पण पिकाचा दर्जाही बदलणार आहे. मध्य प्रदेश हा भारतातील बटाट्याचा सहावा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. बटाटा उत्पादनात माळवा क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावतो. बटाटा प्रक्रियेसाठी हे एक आदर्श क्षेत्र म्हणून उदयास येत असल्याचे मध्य प्रदेशचे फलोत्पादन मंत्री भरतसिंग कुशवाह यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

देशातील बटाटा उत्पादक प्रदेश

मध्य प्रदेशातील प्रमुख बटाटा उत्पादक क्षेत्रांमध्ये इंदूर, उज्जैन, देवास, शाजापूर, छिंदवाडा, सिद्धी, सतना, रेवा, सुरगुजा, राजगड, सागर, दमोह, जबलपूर, पन्ना, मुरैना, छतरपूर, विदिशा, रतलाम आणि बैतुल यांचा समावेश आहे. मध्यप्रदेशातील एकूण बटाटा उत्पादनात एकट्या इंदूर जिल्ह्याचा 30 समावेश आहे. मात्र, राज्यात उच्च प्रतीच्या बियाणांचा तुटवडा ही नेहमीच समस्या राहिली आहे. पण या संशोधनामुळे बटाटा संशोधन संस्थेशी झालेल्या करारामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.

एरोपोनिक तंत्रज्ञानात नेमके आहे तरी काय ?

एरोपोनिक तंत्राद्वारे पोषक द्रव्यांची फवारणी अचूक पद्धतीने मुळांमध्ये केली जाते. वनस्पतीचा वरचा भाग मोकळ्या हवेत व प्रकाशात राहतो. एका वनस्पतीपासून सरासरी 36-60 मिनीकंद मिळतात. शिवाय या पध्दतीमध्ये मातीचा वापरच होत नाही. जमिनीशी संबंध न आल्याने त्याच्या संबंधित जे रोग आहेत ते उद्भवत नाहीत आणि पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत एरोपोनिक प्रणालीमुळे ब्रीडर बीच्या वाढीमध्ये दोन वर्षे बचत होते. 8 राज्यांमधील 20 कंपन्यांसह बटाटा बियाणे उपलब्धतेसाठी या तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण केले गेले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.