Agricultural Pump : निर्णय झाला मात्र, आदेश नसल्यामुळे जोडणी नव्हे तोडणीच सुरु, रब्बी धोक्यातच

कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत तर करुच नये शिवाय ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय अधिवेशनात झाला असला तरी प्रत्यक्षात तसे आदेश स्थानिक पातळीवर मिळालेले नाहीत. त्यामुळे वीज जोडणी तर सोडाच पण तोडणीच सुरु असल्याचे चित्र शेतशिवारात आहे. एकीकडे नांदेड जिल्ह्यात वीजोजडणी केली जात आहे तर दुसरीकडे जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये आदेश मिळाले नसल्याचे सांगत ही कारवाई सुरु आहे.

Agricultural Pump : निर्णय झाला मात्र, आदेश नसल्यामुळे जोडणी नव्हे तोडणीच सुरु, रब्बी धोक्यातच
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 3:53 PM

जालना : कृषीपंपाचा (Power Supply) विद्युत पुरवठा खंडीत तर करुच नये शिवाय ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय अधिवेशनात झाला असला तरी प्रत्यक्षात तसे आदेश स्थानिक पातळीवर मिळालेले नाहीत. त्यामुळे वीज जोडणी तर सोडाच पण तोडणीच सुरु असल्याचे चित्र शेतशिवारात आहे. एकीकडे नांदेड जिल्ह्यात वीजोजडणी केली जात आहे तर दुसरीकडे (Jalna District) जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये आदेश मिळाले नसल्याचे सांगत ही कारवाई सुरु आहे. दोन दिवसांपूर्वीच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यासाठी वीज तोडणीची मोहिम स्थगित करण्याचे सांगितले होते. मात्र, अनेक जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे पाण्याअभावी (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान हे सुरुच आहे.

134 कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत

कृषीपंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे ऐन रब्बी हंगामात विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहिम महावितरणने हाती घेतली होती. यामुळे अडचणीत आलेला शेतकरी थकबाकी अदा करेल असा विश्वास महावितरण कंपनीला होता. पण खरिपात झालेले नुकसान आणि रब्बी हंगामातही निसर्गाचा लहरीपणा कायम असल्याने शेतकरी हे वीजबिल अदाच करु शकले नाहीत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील तब्बल 134 कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. अद्यापही वीजजोडणी झाली नसल्याने पिकांचे नुकसान हे सुरुच आहे.

आतापर्यंत कारवाई आता मनामानी

मध्यंतरी वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येत होते. पण वीज जोडणीचे आदेश दिल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी होताना पाहवयास मिळत नाही. तसेच सलग सुट्यामुळे अधिकारी बांधावर तर सोडाच पण कार्यालयातही नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे रब्बी पिकांवरील संकट अद्यापही टळलेले नाही. मात्र, लेखी आदेश मिळाले नसल्याचेही अधिकारी सांगत आहेत.

पीक बहरात असतानाच विद्युत पुरवठा खंडीत

रब्बी हंगामातील पिके ही पोषक वातावरणामुळे बहरात आहेत. मात्र, उत्पादन वाढीसाठी जोमात असलेल्या पिकांना आता पाण्याची गरज आहे. असे असताना कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरु झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सोयाबीन, हरभरा, ज्वारी हे अंतिम असून एक पाणी दिले तर उत्पादनात भर पडणार आहे. पण कृषीपंपाचा विद्युत पुरवठाच सुरळीत होत नसल्याने शेतकरी हताश आहे.

संबंधित बातम्या :

Soybean Damage : सोयाबीन पिकलं अन् शेतातच कुजलं, हे सर्व रस्त्याअभावी लातुरात घडलं..!

Sugarcane Cane : मराठवाड्याच्या मदतीला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने..! गावनिहाय नियोजनातून मिटेल का अतिरिक्त ऊसाचा प्रश्न?

Grape : द्राक्ष उत्पादकांवर आता दुहेरी संकट, हंगामाच्या अंतिम टप्प्यात सर्वकाही गमावले..!

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.