Agricultural Pump : थकबाकी अदा करुनही विद्युत पुरवठा खंडीत, नांदेडमध्ये सरकारला घरचा आहेर..!

कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत यावरुन अनेक ठिकाणी आंदोलने, निदर्शने झाली आहेत. ऐन रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच ही कारवाई केली जात असल्याने रोष व्यक्त केला जात आहे. पण नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव सर्कल मधील 6 गावच्या शेतकऱ्यांनी महावितरणने ठरवून दिलेली रक्कम अदा केली आहे. असे असतानाही संपूर्ण थकबाकीच अदा करण्याची मागणी होत आहे.

Agricultural Pump : थकबाकी अदा करुनही विद्युत पुरवठा खंडीत,  नांदेडमध्ये सरकारला घरचा आहेर..!
कृषी पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 10:17 AM

नांदेड : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत यावरुन अनेक ठिकाणी आंदोलने, निदर्शने झाली आहेत. ऐन (Rabi Season) रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच ही कारवाई केली जात असल्याने रोष व्यक्त केला जात आहे. पण (Nanded District) नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव सर्कल मधील 6 गावच्या शेतकऱ्यांनी महावितरणने ठरवून दिलेली (Agricultural Pump) कृषीपंपाची थकबाकी अदा केली आहे. असे असतानाही संपूर्ण थकबाकीच अदा करण्याची मागणी होत आहे. या सक्तीच्या वसुली विरोधात आता शिवसेनाच आक्रमक झाली आहे. महावितरणच्या या कारभाराचा निषेध करीत महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत. नियमित वेळी विद्युत पुरवठा करण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शिवाय वेळेत विद्युत पुरवठा न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून नियमित वेळी विद्युत पुरवठा केला जात नसल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे. भविष्यात उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

महावितरणकडून नियमबाह्य वसुली

एकूण थकबाकी नाही तर विजबिलाच्या 25 टक्के रक्कम अदा झाल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे सरकारचे आदेश आहेत. त्यामुळे रखडलेली वसुलीही होईल आणि रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान होणार नाही असा दुहेरी उद्देश साधला जात आहे. पण नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव सर्कलमध्ये संपूर्ण थकबाकी अदा केल्यावरच विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल अशी भूमिका महावितरणने घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान

मराठवाड्यात सध्या उन्हाचा कडाका वाढलेला आहे. यातच रब्बी हंगामातील पिके जोमात असून पीक वाढीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. असे असतानाच विद्युत पुरवठा खंडीत केला जात असल्याने पिकांची जोपासणा करावी कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवाय ठरवून दिलेली रक्कम अदा करुनही सुरळीत पुरवठा होत नसल्याने महावितरणच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी आंदोलनात

निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. असे असतानाच आता कुठे वातावरण निवळले आहे यातच महावितरणकडून मनमानी कारभार केला जात आहे. शेतकऱ्यांकडून थकीत रक्कमही अदा केली जाईल पण त्यासाठी रब्बी हंगामातील पिके पदरी पडणे गरजेचे आहे. या उत्पन्नातूनच हे पैसे अदा केली जातील. महावितरणने कठोर भूमिका घेतली तर यापुढेही आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Mango : उन्हाळ्यात नव्हे तर पावसाळ्याच्या तोंडावर चाखा आता केसरची चव, कशामुळे ओढावली परस्थिती?

ऊसतोडणी धिम्या गतीने तरीही साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच घोडदौड कायम..! कारखान्यांवर दबाव कशाचा?

PM Kisan : 48 लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही 10 हप्ता, योजनेचा लाभ घ्यायचा आहे मग ‘ही’ प्रक्रिया कराच..!

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.