Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : पावसाने साधले मृगाचे मुहूर्त, कांदा उत्पादकांचे मात्र नुकसानच

गेल्या तीन महिन्यापासून कांदा उत्पादकांना वाढीव दराची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदाचाळीमध्ये कांद्याची साठवणूक केली आहे. असे असताना विसापूर येथे सुसाट्याच्या वाऱ्याने कांद्याच्या शेडच्या छताचे पत्रे उडून गेल्याने जवळपास 700 क्विंटल कांदा भिजल्याने नुकसान झाले. त्यामुळे साठवले तरी नुकसान अन् बाजारपेठेतही घटत्या दरामुळे नुकसान हे ठरलेलेच आहे.

Nashik : पावसाने साधले मृगाचे मुहूर्त, कांदा उत्पादकांचे मात्र नुकसानच
पहिल्याच पावसामध्ये साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 10:23 AM

मालेगाव : उशीरा का होईना (North Maharashtra) उत्तर महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. मृगाचे मुहूर्त मान्सूनने साधले असून हा पहिला पाऊस कहीं खुशी..कही गम असाच ठरला आहे. (Kharif Season) खरिपासाठी हा पाऊस पोषक असला तरी विसापूर एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे दरामुळे (Onion Crop) कांदा उत्पादक अडचणीत असताना आता शुक्रवारी झालेल्या पावसामुळे कांदा शेडवरील पत्रे उडून गेल्याने तब्बल 700 क्विंटल कांदा हा भिजला आहे. त्यामुळे पहिल्या पावसाची उत्सुकता तर होतीच पण अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत. मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे खरीपपूर्व मशागतीची कामांना वेग येणार आहे. तर वेळेत खरिपाच्या पेरण्या होतील असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

दुष्काळात तेरावा, पदरी नुकसानच

गेल्या तीन महिन्यापासून कांदा उत्पादकांना वाढीव दराची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदाचाळीमध्ये कांद्याची साठवणूक केली आहे. असे असताना विसापूर येथे सुसाट्याच्या वाऱ्याने कांद्याच्या शेडच्या छताचे पत्रे उडून गेल्याने जवळपास 700 क्विंटल कांदा भिजल्याने नुकसान झाले. त्यामुळे साठवले तरी नुकसान अन् बाजारपेठेतही घटत्या दरामुळे नुकसान हे ठरलेलेच आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक अडचणीत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतले चित्र बदलत असताना आता 700 क्विंटल कांदा भिजल्याने हे नुकसान कसे भरुन काढले जाणार हा प्रश्नच आहे.

उशीरा का होईना मुहूर्त साधले आता पेरणीचे वेध

यंदा वेळेपूर्वी दाखल होणारा मान्सून नियमित वेळेही बरसला नाही. त्यामुळे खरिपावर चिंतेचे ढग होते. हवामान विभागाने वेळोवेळी अंदाज वर्तवले पण प्रत्यक्षात उत्तर महाराष्ट्रात मृगातच पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता खरिपपूर्व मशागतींच्या कामांना वेग येणार असून पावसामध्ये सातत्य राहिल्यास नियमित वेळी पेरण्यादेखील होतील असा अंदाज आहे. शिवाय पेरणीची पूर्ण तयारी झाली असली तर 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्यावर अन् जमिनीत ओलावा असल्यावरच चाढ्यावर मूठ ठेवण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्याच पावसामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू

कळवण तालुक्यासह परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली होती. हंगामातील पहिला पाऊस खरिपासाठी पोषक तर राहिलाच पण यामुळे नुकसानही अधिक झाले आहे. विसापूर येथे शेतकरी बारकू गोपू सोनवणे यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर वादळी वाऱ्यामुळे कांदा शेडवरील पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे 700 क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे.

एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू.
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.