Washim : खरिपातील दोन्ही शेतीमालाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांचे ‘टायमिंग’ चुकले

हंगामाच्या सुरवातीपासून केवळ योग्य वेळी शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेतल्यामुळेच उत्पादन घटूनही शेतकऱ्यांनी त्याची अधिकची झळ बसू दिलेली नव्हती. उत्पादनात घट म्हणल्यावर सोयाबीन आणि कापसाला वाढीव दर मिळणारच ही खुणगाठ शेतकऱ्यांनी बांधली होती. त्यामुळेच मागणी असेल तरच शेतीमालाची विक्री ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांचे टायमिंग हुकत असल्याचे जाणवत आहे.

Washim : खरिपातील दोन्ही शेतीमालाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांचे 'टायमिंग' चुकले
तुरीच्या दरात घसरण सुरुच आहे. सरकारच्या निर्णयाचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 9:36 AM

वाशिम : हंगामाच्या सुरवातीपासून केवळ योग्य वेळी शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेतल्यामुळेच (Kharif Production) उत्पादन घटूनही शेतकऱ्यांनी त्याची अधिकची झळ बसू दिलेली नव्हती. उत्पादनात घट म्हणल्यावर सोयाबीन आणि कापसाला वाढीव दर मिळणारच ही खुणगाठ शेतकऱ्यांनी बांधली होती. त्यामुळेच मागणी असेल तरच शेतीमालाची विक्री ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांचे टायमिंग हुकत असल्याचे जाणवत आहे. मध्यंतरी (Soybean Crop) सोयाबीन आणि तुरीला विक्रमी दर मिळाला असतानाही शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला. शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा असतानाच (Prices of agricultural commodities) खरिपातील सोयाबीन आणि तुरीचे दर आता घटले आहे. जिल्ह्यातील रिसोड आणि कारंजा बाजारपेठेत गेल्या पाच दिवसांतच तुरीच्या दरात अडीचशे रुपयांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे 7 हजार 600 वर गेलेले सोयाबीन आता 7 हजार 100 येऊन ठेपले आहे. त्यामुळे आतापर्यंत योग्य टायमिंगच्या शोधात असलेला बळीराजा अंतिम टप्प्यात चुकला असल्याचे चित्र आहे.

उत्पादन घटूनही अधिकचा नफा मिळवण्याचा प्रयत्न

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये तुरीला अधिकचा फटका बसला नसला तरी अंतिम टप्प्यात झालेला अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे थेट शेंगावरच परिणाम झाला होता.त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. उत्पादन घटूनही वाढीव दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक हेच धोरण शेतकऱ्यांनी स्वीकारले होते. संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांनी हाच निर्णय कायम ठेवल्याने सोयाबीन आणि कापसाला विक्रमी दर मिळाला होता. कधी नव्हे तो कापूस 11 हजार रुपये क्विंटल तर सोयाबीनला महिन्याभरापूर्वी 7 हजार 600 चा दर मिळाला होता. सध्या कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, तूर आणि सोयाबीनची शेतकऱ्यांनी साठवणूक केलेली आहे.

काय आहे बाजारपेठेतले चित्र ?

सध्या बाजारपेठेत सोयाबीन, तूर आणि रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक वाढली आहे. मात्र, मध्यंतरी सोयाबीनचे दर हे 7 हजार 600 पर्यंत पोहचले असताना शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा होती. त्यामुळे पुन्हा विक्रीपेक्षा शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भर दिला होता. मात्र, सध्या 7 हजार 600 वरील सोयाबीन थेट 7 हजार 100 वर येऊन ठेपले आहे. दुसरीकडे तुरीचीही हीच अवस्था आहे. मागील आठवड्यात तुरीने सात हजारांपर्यंतचा टप्पा गाठला होता. मात्र काही दिवसात कारंजात तुरीला 6600 मानोऱ्यात 6475 मंगरूळपीर 6400 तर वाशिममध्येही तुरीला 6550 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला होता त्यातही आता मात्र तुरीच्या दरात घसरण सुरू आहे.

टप्प्याटप्प्याने विक्रीच शेतकऱ्यांसाठी फायद्याची

वाढीव दराच्या अपेक्षेने शेतकरी शेतीमालाची साठवणूक करीत आहे. बाजारपेठेच्या अभ्यासासाठी हे चांगले असले तरी योग्य टायमिंग साधणे तेवढेच महत्वाचे आहे. यंदा शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचा त्यांना फायदा झाला आहे. मात्र, आता खरिपाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शिवाय उन्हाळी सोयाबीनचीही आता आवक सुरु होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने शेतीमालाची विक्री करणे हेच फायद्याचे राहणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

YAVATMAL मध्ये खाणीतील धुळीने पीक काळवंडली, शेतकरी चिंतेत; आंदोलनाचा इशारा

Mango cultivation : आंबा लागवडीच्या योग्य नियोजनाने होईल उत्पादनात दुप्पट वाढ, जाणून घ्या सर्वकाही

SOLAPUR PUNE राष्ट्रीय महामार्गावरील केळी निर्यातीचे गोडाऊन पेटले, लाखो रूपयाचं नुकसान

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.