प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नेमकी काय? लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा?

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाते. Prime Minister Agri Irrigation Scheme

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नेमकी काय? लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा?
ठिबक सिंचन योजना
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 5:05 PM

मुंबई: राज्यातले शेतकरी आता आधुनिक शेतीचा पर्याय स्वीकारत आहेत. शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. शेतीला जलसिंचन करणं हे शेतकऱ्यांपुढील मोठं काम असतं. पारंपारिक पद्धतीनं पाणी दिल्यास इंधन, वेळ आणि पाण्याचा अपव्यय होतो. केंद्र आणि राज्य सरकार शेतीमध्ये सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर व्हावा म्हणून प्रयत्न करत आहे. सरकारकडून ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन्ही पद्धतींचा पुरस्कार करण्यात येतो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाते. (Prime Minister Agri Irrigation Scheme know how to apply)

ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर

पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते. तुषार सिंचन हे एक असे साधन आहे जे शेती पिके, लॉन्स, भूदृश्य, गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरली जाते. ते थंड करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी देखील वापरली जाते. तुषार सिंचन ही पावसासारख्याच प्रकारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा मार्ग आहे.

कोणते शेतकरी अर्ज करु शकतात ?

शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा असावा. शेतकरी अनुसूचित. जाती , अनुसूचित जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे. 2016-17 पूर्वी एखा्द्या शेतकऱ्यानं एखाद्या सर्व्हेनंबरसाठी लाभ घेतला असल्यास पुढील 10 वर्ष तर 2017-18 लाभ घेतला असल्यास पुढील 7 वर्ष त्या सर्व्हे नंबरवर योजनेचा लाभ घेता येणार नाही. लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्याकडं कायम स्वरुपी वीज कनेक्शन असावं. सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनधींनी तयार केलेली असावी. 5 हेक्टरच्या मर्यादेतील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सादर योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी 55 टक्के तर, इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान मिळते.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड ७/१२ उतारा ८ अ दाखला वीज बिल खरेदी केलेल्या संचाचं बिल जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी ) स्वयं घोषणापत्र पूर्वसंमती पत्र

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी शेतकरी योजनावर क्लिक करावे. पुढे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निवडावी. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी पहिल्यांदा नोंदणी करण्यासाठी नवीन वापरकर्ता नोंदणीवर क्लिक करा. पुढे शेतकऱ्यांनी त्यांचं नाव टाकावे, युजर नेम आणि पासवर्ड टाकून महाडीबीटीवर लॉगीन तयार करा त्यासाठी शेतकऱ्याकडे ईमेल आयडी असणं बंधनकारक असून त्यांचं आणि मोबाईल नंबंरचं व्हेरिफिकेशन करावं लागते. लॉगीन करुन अर्ज भरावा लागेल. लॉगीन केल्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकून आधार प्रमाणीकरण करुन घ्या. शेतकऱ्यांनी वैयक्तिक माहिती, शेती जमिनीची माहिती भरा.

लॉगीन केल्यानंतर शेतकऱ्यांनी पुढील माहिती भरुन एकाच अर्जाद्वारे विविध योजनांचा लाभ घेता येतो. त्यापैकी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पर्याय निवडून पुढे जावे. कृषी सिंचन योजना हा पर्याय निवडावा. त्यानंतर हव्या असलेल्या सिंचन प्रकाराचा पर्याय निवडावा. सर्व माहिती भरुन अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करावे.अर्ज सादर केल्यानंतर प्राधान्य क्रमांक निवडावा.त्यानंतर अर्जाची फी भरावी. यासाठी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतात.

महाडीबीटी पोर्टलवरुन विविध शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक शेतकरी-एक अर्ज या पद्धतीद्वारे एकचं अर्ज करणं अपेक्षित आहे. त्यामुळे दुसरा अर्ज करता येणार नाही. परंतु पहिला अर्ज रद्द करुन पसंतीच्या सर्व बाबींसाठी पुन्हा नव्यानं एकच अर्ज करता येईल. त्यासाठी पहिला अर्ज रद्द करावा लागेल.

संबंधित बातम्या :

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘या’ पोर्टलवर अर्ज करा, 31 डिसेंबर शेवटची तारीख

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज?

Prime Minister Agri Irrigation Scheme know how to apply

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.