Nanded : नांदेडकर साधणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद, योजनांची माहिती अन् शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणाऱ्या संवादाच्या अनुशंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. कोणत्या योजनांवर मोदी हे संवाद साधणार आहेत. शिवाय स्थानिक पातळीवर किती लाभार्थी आहेत याचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

Nanded : नांदेडकर साधणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद, योजनांची माहिती अन् शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 10:57 AM

नांदेड : दोन दिवसांपूर्वीच (Central Government) केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता हा 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार लाभधारकांशी संवाद साधणार आहेत. केंद्राच्या माध्यमातून 16 योजना राबवल्या जाणार असून यासंदर्भात (PM Modi) पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. यामध्ये (Nanded District) नांदेड जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांना संधी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमाचतून राबवल्या जाणाऱ्या योजना आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा या विषयावर ही चर्चा होणार आहे. त्यामुळे या संवाद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आढावा बैठक घेऊन सर्व संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.

या योजनांवर आधारित होणार संवाद

सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्धता ठेऊन केंद्र सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. या योजनेत प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी, उज्जवला योजना, पोषण अभियान, मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, आणि अमृत, स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, गरीब कल्याण अन्न योजना, जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, मुद्रा योजनांचा समावेश आहे. दुर्गम भागातील लाभार्थ्यांपासून महानगरापर्यंतच्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणाऱ्या संवादाच्या अनुशंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. कोणत्या योजनांवर मोदी हे संवाद साधणार आहेत. शिवाय स्थानिक पातळीवर किती लाभार्थी आहेत याचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, भोकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

जिल्हाधिकारी यांचे काय आहे आवाहन?

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हाती घेतलेल्या अमृत सरवर योजना व इतर योजनांचाही आढावा घेण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना विविध लोकोपयोगी व पर्यावरण संतुलनाशी निगडीत असलेल्या योजनांमध्ये लोकांचाही सहभाग अपेक्षित आहे. हा लोकसहभाग घेण्यासमवेत सामाजिक बांधिलकीतून जिल्ह्यातील विविध उद्योगांची यात सहकार्य घेता येईल. शासकीय अधिकाऱ्यांनी केवळ याला नोकरीचा भाग न समजता आपलीही व्यक्तीगत बांधिलकी या नात्याने पुढे सरसावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.