नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan)च्या आठव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी म्हणजेच शुक्रवारी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करतील. यानंतर ते पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करतील. या कार्यक्रममध्ये आपण pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यामध्ये 2 हजार रुपयांची रक्कम मिळेल. नरेंद्र मोदी 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 19 हजार कोटी रुपये वर्गत करतीलय या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 7 हप्त्यांमध्ये 14 हजार मिळाले आहेत. (Prime Minister Narendra Modi will released the eighth instalment of PM Kisan Yojana on 14 May)
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. पहिल्यांदा 3 कोटी 16 लाख 05 हजार 539 शेतकर्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 कोटीहून अधिक शेतकर्यांची नोंदणी झाली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर केलेला हप्ता 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना देण्यात आला. आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्यात जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. यावेळी केंद्र सरकारने एकूण 10 कोटी 48 लाख 95 हजार 545 शेतकर्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठविले होते.
प्रधानमंत्री @narendramodi 14 मई को सुबह 11 बजे #PMKisan की अगली किस्त जारी करेंगे और किसानों के साथ संवाद करेंगे। इस इवेंट से लाइव जुड़ने के लिए रजिस्टर करें: https://t.co/kp6v0UPWKK pic.twitter.com/17bhG9S2kb
— MyGovHindi (@MyGovHindi) May 13, 2021
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची रक्कम 25 डिसेंबर 2020 पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा 1 डिसेंबर 31 ते मार्च या कालावधीत दिला जातो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात तिसऱ्या हप्त्याचा लाभ 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मिळतो.
स्टेप 1: सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
स्टेप 2:तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
स्टेप 3:होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
स्टेप 4:जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आणि आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल तर आधार नंबर चुकीचा असल्याची माहिती तिथे मिळेल.
स्टेप 5: फार्मर किंवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
स्टेप 6: पीएम किसान पोर्टलवर सरकारनं शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. तिथे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर याचा वापर करता येईल.
स्टेप 7:ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, त्यांची यादी राज्य, जिल्हा तालुका, गाव, कॅटेगरी सिलेक्ट करुन पाहू शकता.
संबंधित बातम्या:
PM Kisan: पीएम किसान योजनेतून अपात्र शेतकऱ्यांची नाव वगळली, तुमचं रेकॉर्ड तपासलं का?
(Prime Minister Narendra Modi will released the eighth instalment of PM Kisan Yojana on 14 May)