पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, ‘या’ योजनेसाठी 35 हजार कोटी मंजूर; जाणून घ्या योजनेचं नाव

देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी आज मंत्रिमंडळाने स्वीकारल्या. यासंदर्भात शिफारसी करणारे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आपण अभिनंदन करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 'या' योजनेसाठी 35 हजार कोटी मंजूर; जाणून घ्या योजनेचं नाव
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 10:07 PM

नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने PM-AASHA या योजनेसाठी 35,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांवर उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यासाठी देखील महत्वाचा निर्णय घेतला आहे.सरकारने जाहीर केले की पीएम-आशा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या मिळकतीत वाढ होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाने डाळ आणि तिळाच्या शेती पिकांना किमान मूल्य मिळणार आहे.भारतात या प्रकारच्या पिकांमध्ये आत्मनिर्भर होणार आहे. त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

पीएम-आशा म्हणजे काय?

PM-ASHA ही एकात्मिक योजना आहे. शेतकरी आणि ग्राहकांच्या सेवेसाठी केंद्र सरकारने किंमत समर्थन योजना (PSS) आणि किंमत स्थिरीकरण निधी (PSF) योजना PM आशा योजनेमध्ये विलीन केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला किमान हमी भाव मिळण्यास मदत होईलच, शिवाय ग्राहकांचीही सोय होणार आहे.

कॅबिनेटचे अन्य निर्णय

आज कॅबिनेटच्या बैठकीत मीडिया आणि मनोरंजन जगतातील महत्वाचे निर्णय घेतले. अॅनिमेशन, व्हीज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटीसाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापित करण्यास मंजूरी मिळाली आहे. क्रिएटर्सच्या इको-सिस्टमला त्यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.तसेच रोजगारांच्या नव्या संधी मिळणार आहेत. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत ‘बायो-राइड’ योजनेला मंजूरी दिली आहे. या निर्णयाने जैवतंत्रज्ञानात भारताची प्रगती होणार आहे. यामुळे सातत्याने विकास, आर्थिक पोषण आणि क्षमतेत वाढ करण्यावर जोर देण्यात येणार आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.