Chickpea Crop: हरभऱ्याचे उत्पादन वाढले अन् ‘नाफेड’चेही नियोजन हुकले

आतापर्यंत खरेदी केंद्रावरील नियम, अटींमुळे शेतकऱ्यांनी कायम केंद्राकडे पाठ फिरवली आहे. शेतीमालातील आद्रता आणि बीलासाठी लागणारा अवधी यामुळे कमी किंमतीत का असेना पण शेतकरी खुल्या बाजारातच विक्री करीत असत. यंदा मात्र दरातील तफावत आणि खरेदी केंद्रावरील नियम अटींमध्ये झालेला बदल यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. पण वाढत्या आवकमुळे हरभरा साठवणूकीसाठी जागाही शिल्लक नाही तर अंतिम टप्प्यात बारदाणाही शिल्लक नसल्याने हरभरा खरेदीचा खेळखंडोबा झाला आहे.

Chickpea Crop: हरभऱ्याचे उत्पादन वाढले अन् 'नाफेड'चेही नियोजन हुकले
हरभरा खरेदी केंद्रImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 11:47 AM

लातूर : गेल्या 5 दिवसापासून राज्यातील (Chickpea Purchase Centre) हरभरा खरेदी केंद्रावर शेतीमाल घेऊन वाहने उभा आहेत. मात्र, ना खरेदी ना कोणते व्यवहार. अचानक नेमके झाले तरी काय ? असा सवाल उपस्थित होता. यंदा (Chickpea Production) हरभऱ्याचे वाढलेले उत्पादन आणि खुल्या बाजारपेठेत घटलेले दर यामुळे शेतकऱ्यांनी आधार घेतला तो खरेदी केंद्राचा. गेल्या दोन महिन्यापासून हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने (Chickpea Stock) हरभरा साठवणूकीसाठीही जागा शिल्लक नाही. शिवाय बारदाणाही संपलेला आहे. त्यामुळे मुदतीपुर्वीच राज्यभरातील खरेदी केंद्र ही बंद ठेवावी लागली आहेत. वाढत्या उत्पादनामुळे अखेर ही वेळ नाफेडवर आली आहे. आता नोंदणी खरेदी केंद्रावर अन् विक्री खुल्या बाजारपेठेत.

शेतकऱ्यांची तयारी, नाफेडच्या अडचणी

आतापर्यंत खरेदी केंद्रावरील नियम, अटींमुळे शेतकऱ्यांनी कायम केंद्राकडे पाठ फिरवली आहे. शेतीमालातील आद्रता आणि बीलासाठी लागणारा अवधी यामुळे कमी किंमतीत का असेना पण शेतकरी खुल्या बाजारातच विक्री करीत असत. यंदा मात्र दरातील तफावत आणि खरेदी केंद्रावरील नियम अटींमध्ये झालेला बदल यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. पण वाढत्या आवकमुळे हरभरा साठवणूकीसाठी जागाही शिल्लक नाही तर अंतिम टप्प्यात बारदाणाही शिल्लक नसल्याने हरभरा खरेदीचा खेळखंडोबा झाला आहे. शेतकरी हरभरा घेऊन केंद्रावरच रात्र जागूण काढीत आहे पण गेल्या तीन दिवसांपासून बारदाण्याचा प्रश्नच मार्गी लागलेला नाही. त्यामुळे या अडचणीवर काय पर्याय काढला जाणार का हे पहावे लागणार आहे.

नियोजनाचा आभाव, शेतकऱ्यांचे नुकसान

हमीभाव केंद्रावर शेतीमालाची विक्री करण्यासाठी अगोदर नोंदणी गरजेची आहे. त्यानुसार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्राकडून मॅसेज तर आले आहेत पण प्रत्यक्षात हरभऱ्याची विक्री झालेली नाही. त्यामुळे वाहतूकीचा खर्च आणि विक्रीच्या प्रतिक्षेत केंद्रासमोर वाहनांच्या रांगा दिसत आहेत. शेतकऱ्यांना शेतीमाल घेऊन परतावे लागत आहे तर काहीजण लागलीच खुल्या बाजारात कमी किंमतीमध्ये हरभऱ्याची विक्री करीत आहेत. नाफेडचे नियोजन हुकले असले तरी त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांवर झाला आहे.

हे सुद्धा वाचा

वाढीव मुदतीची आशा

मुदतीपूर्वीच राज्यभरातील हरभरा खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. खरीप हंगामातील बी-बियाणांसाठी पैशाची गरज असल्यामुळे अनेकांनी साठवणूकीतील हरभरा विक्रीसाठी काढला मात्र, ही अडचण निर्माण झाली आहे. खुल्या बाजारात विक्री केली तर क्विंटलमागे 1 हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे बारदाणा उपलब्ध होताच पुन्हा खरेदी केंद्र सुरु करुन शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांसह केंद्र चालकांकडून होत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.