Rabi Crop: अखेर शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली, शेतीमालाला योग्य दर अन् आवक वाढली तरी चिंता नाही?

यंदा रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र हे दुपटीने वाढले आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पदनात वाढही झालेली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच कृषी विभागाने ही उत्पादकता जाहीर केलेली आहे. वाढत्या उत्पादनामुळे खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे दर स्थिर आहेत. खुल्या बाजारपेठेत 4 हजार 500 असा सरासरी दर आहे. तर दुसरीकडे नाफेडने हरभऱ्यासाठी खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटलची घोषणा केली आहे.

Rabi Crop: अखेर शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली, शेतीमालाला योग्य दर अन् आवक वाढली तरी चिंता नाही?
हरभरा खरेदी केंद्रImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 1:22 PM

अमरावती : यंदा  (Rabi Season) रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र हे दुपटीने वाढले आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पदनात वाढही झालेली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच कृषी विभागाने ही उत्पादकता जाहीर केलेली आहे. वाढत्या उत्पादनामुळे खुल्या बाजारपेठेत (Chickpea Crop) हरभऱ्याचे दर स्थिर आहेत. खुल्या बाजारपेठेत 4 हजार 500 असा सरासरी दर आहे. तर दुसरीकडे नाफेडने (Chickpea Crop) हरभऱ्यासाठी खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटलची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात खरेदी केंद्राला सुरवात कधी याची चिंता शेतकऱ्यांना लागली होती. पण अमरावती जिल्ह्यात हरभरा खरेदी केंद्राला सुरवात झाली आहे. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीमध्ये ही सुरवात झाली असून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता आवक वाढली तरी त्याचा दरावर परिणाम होणार नाही. मात्र, विक्रीपूर्वीची नोंदणी गरजेची आहे.

प्रति क्विटंलमागे 700 रुपायांचा फायदा

सध्या खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 500 रुपये असा सरासरीचा दर आहे. मात्र, आवक वाढली की यामध्ये चढउतार हा ठरलेलाच आहे. मात्र, खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये हा दर ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील दर आणि भविष्यात वाढणारी आवक यामुळे खऱ्या अर्थाने गरज होती ती हमीभाव केंद्राची. मात्र, काढणी आणि मळणी होत असतानाच ही खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांची सोय झाली आहे.

शेतीमालाच्या दर्जा तपासणी करुनच खरेदी

हमीभावाने हरभरा विक्रीची सोय झाली असली तरी केंद्रावर हरभरा दाखल होताच त्याचा दर्जा तपासला जाणार आहे. शिवाय यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण हे 10 पर्यंत असणे गरजेचे आहे. अन्यथा निकृष्ट दर्जाच्या मालाची खरेदी केली जात नाही. खरेदी केंद्रावरील नियम-अटी या मान्य करुनच शेतीमालाची खरेदी होणार आहे. शिवाय शेतीमालाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.

नोंदणी सुरु, ही आहेत आवश्यक कागदपत्रे

खरेदी केंद्रावर शेतीमालाची विक्री करण्यासाठी पिकपेऱ्यावर त्या पीकाची नोंदणी असणे गरजेचे आहे. याकरिता शेतकऱ्यांनी ‘ई-पीक पाहणी’ च्य माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. एवढेच नाही तर नोंदणी करताना शेतकऱ्यांना सहकारी खरेदी विक्री संघ येथे आधार कार्ड, सातबारा, 8 अ उतारा, तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा पीक पेरा उतारा किंवा हरभरा पिकाच्या नोंद असलेला सातबारा, आधार लिंक असलेले बँक पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.

संबंधित बातम्या :

मराठवाड्यातही कृषी पंपाचा वीज प्रश्न पेटला, शेतकऱ्यांना मिळणार का नियमित वीज?

Photo Gallery : होळीची चाहूल देणारा पळस भर उन्हामध्ये भगव्या रंगाने बहरला, काय आहे महत्व?

स्वप्न सत्यामध्ये : पाणंद रस्त्याच्या आराखाड्याला मंजुरी, ग्रामपंचायतीची भूमिका राहणार महत्वाची

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.