Onion Market: बुडत्याला काडीचा आधार, ‘नाफेड’ ची खरेदी अन् शेतकऱ्यांना फायदा, कांद्याच्या मुख्य मार्केटमध्ये चाललयं काय?

अवघ्या दोन महिन्यात कांदा मार्केटमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. हंगामाच्या सुरवातीला विक्रमी दर तर आता कवडीमोल दरात कांदा विक्रीची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक वाढताच हा बदल झाला आहे. पण 'नाफेड' च्या माध्यमातून कांदा खरेदीला सुरवात झाल्याने काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Onion Market: बुडत्याला काडीचा आधार, 'नाफेड' ची खरेदी अन् शेतकऱ्यांना फायदा, कांद्याच्या मुख्य मार्केटमध्ये चाललयं काय?
लासलगाव (जि. नाशिक) येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीला सुरवात झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 9:31 AM

लासलगाव : अवघ्या दोन महिन्यात कांदा मार्केटमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. हंगामाच्या सुरवातीला विक्रमी दर तर आता कवडीमोल दरात कांदा विक्रीची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. (Summer Season) उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक वाढताच हा बदल झाला आहे. पण (NAFED) ‘नाफेड’ च्या माध्यमातून (Onion Market) कांदा खरेदीला सुरवात झाल्याने काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे 200 रुपये दराची सुधारणा झाली आहे. लासलगाव ही सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असून येथूनच नाफेड दरवर्षी कांदा खरेदी करते. खरेदीच्या पहिल्याच दिवशी 150 क्विंटलची खरेदी करण्यात आली होती.

‘नाफेड’ च्या उद्देश काय ?

नाफेड अर्थात केंद्र सरकारच्या माध्यमातून धान्याची खरेदी करुन साठा केला जातो. उर्वरीत काळात धान्याची टंचाई निर्माण झाली किंवा वाजवीपेक्षा अधिकचे दर झाले तर हा खरेदी केलेला माल विक्रीसाठी बाहेर काढला जातो. गेल्या काही महिन्यापूर्वीच कांद्याच्या दरात वाढ होताच हे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने हा साठवणूकीतला कांदा मार्केटमध्ये पाठवून दर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. पण आता कवडीमोल दर असतानाच वाढीव दराने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात आहे.

शेतकऱ्यांना असा झाला फायदा

मागणीच्या तुलनेत देशांतर्गत कांद्याचा पुरवठा अधिक होत असल्याने कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत आहे. कांद्याचे सर्वसाधारण बाजारभाव भाव एक हजार रुपयांच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली.नाफेड मार्फत केंद्र सरकारची लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याच्या खरेदीला सुरुवात झाल्याने नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील बल्हेगाव येथील अनिल ताडगे या कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरासरीच्या तुलनेत 200 रुपये अधिकचा दर मिळाला. कांद्याला 965 रुपये इतका प्रति क्विंटलने व्यापाऱ्यांने खरेदी केलेल्या कांद्याला बाजार भाव मिळाला होता. त्यातीलच कांदा पुन्हा लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणला असतात त्या कांद्याला नाफेडने 1141 रुपये प्रति क्विंटलला बाजार भावाने खरेदी केला. नाफेडने जास्तीत जास्त कांदा खरेदी करत शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळवून देण्याची अनिल ताडगे या शेतकऱ्याने त्यांच्याकडे केली आहे.

दरातील स्पर्धेचा फायदा शेतकऱ्यांना

नाफेड मार्फत केंद्र सरकारची बाजार समितीत कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे. व्यापारी आणि नाफेड मध्ये बाजार भावाची स्पर्धा झाल्यास नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. सुरवातीच्या काळात जरी बाजारपेठ आणि नाफेड यांच्या दरात अधिकची तफावत नसली तरी भविष्यात शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतवारीनुसार कांदा आणला तर अधिकचा फायदा होणार आहे. नाफेडमुळे शेतकऱ्यांना मिळालेल्या संधीचा नक्कीच फायद होईल असा विश्वास बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

Weather Update: पुढचे 2 दिवस पावसाची शक्यता! विदर्भ वगळता मराठवाडा, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Wheat Export: गहू निर्यातीचा श्रीगणेशा..! इजिप्त ठरला पहिला मानकरी, महाराष्ट्राची भूमिका काय?

Sharad Pawar: ‘आळशी माणसांचा भर उसावर’ एका वाक्यात शरद पवारांनी सांगितले अतिरिक्त उसाचे कारण अन् शेतकऱ्यांना मोलाचा सल्लाही..!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.