Kharif Season : उत्पादन बेभरवश्याचे खर्च मात्र ठरलेलाच, इंधन दरवाढीचा शेती व्यवसायावर परिणाम काय?

उत्पादन वाढीसाठी दरवर्षाी हंगमापूर्वीच मशागतीची कामे केली जातात. यामध्ये नांगरणी, मोगडणी, रोटरणे यासारख्या कामांवर शेतकरी भर देत आहे. मशागतीच्या कामांसाठी सर्रास यंत्राचाच वापर केला जात आहे. बैलजोडीचा वापर दुर्मिळ झाला असून कमी वेळत अधिकचे काम आणि उत्पादन घेण्यासाठी शेतकरी यंत्राचाच वापर करीत आहेत.

Kharif Season : उत्पादन बेभरवश्याचे खर्च मात्र ठरलेलाच, इंधन दरवाढीचा शेती व्यवसायावर परिणाम काय?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 10:41 AM

वर्धा : हंगामाच्या सुरवातीला कितीही (Nurturing Environment) पोषक वातावरण असले तरी पीक पदरात पडेपर्यंत त्याची शाश्वती देता येत नाही. असे असले तरी हंगामपूर्व (Agricultural cultivation) मशागतीपासून ते शेतीमाल बाजारपेठेत दाखल करण्यापर्यंतच खर्च हा ठरलेला आहे. हे कमी म्हणून की काय (Increase in fuel prices) इंधन दरात वाढ होत असल्याने शेती व्यवसाय करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या दर वाढीमुळे यंदा नव्याने मळणी यंत्र मालकांनी तसेच हार्वेस्टर यंत्रांच्या मालकांनी दरवाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहे. सध्या पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांना आता यंत्राद्वारे मशागत केल्याशिवाय पर्यायच उरलेला नाही.वाढीव दराने ही कामे करावी लागत असली तरी उत्पादन आणि शेतीमालाचा दर हा बेभरवश्याचाच आहे.

खरीपपूर्व मशगतीची कामे

उत्पादन वाढीसाठी दरवर्षाी हंगमापूर्वीच मशागतीची कामे केली जातात. यामध्ये नांगरणी, मोगडणी, रोटरणे यासारख्या कामांवर शेतकरी भर देत आहे. मशागतीच्या कामांसाठी सर्रास यंत्राचाच वापर केला जात आहे. बैलजोडीचा वापर दुर्मिळ झाला असून कमी वेळत अधिकचे काम आणि उत्पादन घेण्यासाठी शेतकरी यंत्राचाच वापर करीत आहेत. शेती व्यवसायात हा बदल होत असला तो शेतकऱ्यांसाठी तो खर्चिक आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर ही मशागतीची कामे केली जातात.

असे वाढले आहेत मशागतीचे दर

इंधन दरवाढीचा परिणाम हा थेट शेतकऱ्यांचा बांधापर्यंत येऊन ठेपत आहे. यंत्राद्वारे मशागतीच्या कामासाठी वर्षाकाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. गतवर्षी एक एकर शेत जमिन नांगरणीसाठी 1 हजार 500 रुपये तर यंदा 2 हजार रुपये, रोटरण्यासाठी गतवर्षी 600 हजार तर यंदा 1 हजार रुपये व शेत मोगडण्यासाठी गतवर्षी एकराला 800 रुपये तर यंदा 1 हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागत आहे. यंत्राच्या दराबरोबर मजुरांचेही दर वाढत आहे. मजुरांना गतवर्षी 200 रुपये दिवसाकाठी तर यंदा 300 रुपये द्यावे लागत आहे.

हे सुद्धा वाचा

उत्पादन बेभरवश्याचे

खरीप हंगामातील पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांना एकरी हजारो रुपये खर्च हा ठरलेला आहे. वर्धा जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट ही ठरलेली आहे. शिवाय सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. उत्पादनापेक्षा खर्चात अधिक भर झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नांगरणी, निंदण, खत, औषधे, कापूस वेचाई करेपर्यंत शेतकऱ्यांची दमछाक होते. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासून खर्च ठरलेला असला तरी उत्पादन हे भरवश्याचे नाही हे मात्र नक्की.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.