PM मोदींनी Zero Budget शेतीचे फायदे सांगितले, अलिबागच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, अडीच गुंठ्यात अस्सल मिरचीचा ‘ठसका’

केंद्र सरकारने सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवण्यावर भर दिला आहे. एवढेच नाही तर मध्यंतरी गुजरात येथे झालेल्या कृषीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्रन मोदी यांनी नैसर्गिक शेती हेच शेती व्यवसयाचे भवितव्य आहे. त्यादृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काही राज्यांनी नैसर्गिक शेतीचे नियोजन आणि कार्यपध्दतीही ठरवलेली आहे. महाराष्ट्राने याबाबत अद्यापही कोणतेही धोरण ठरवले नसले तरी अलिबागच्या सचिन बैकर या तरुण शेतकऱ्याने केलेला सेंद्रीय शेतीचा प्रयोग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

PM मोदींनी Zero Budget शेतीचे फायदे सांगितले, अलिबागच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, अडीच गुंठ्यात अस्सल मिरचीचा 'ठसका'
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 10:22 AM

अलिबाग : केंद्र सरकारने (Organic Farm) सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवण्यावर भर दिला आहे. एवढेच नाही तर मध्यंतरी गुजरात येथे झालेल्या कृषीच्या कार्यक्रमात (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्रन मोदी यांनी नैसर्गिक शेती हेच शेती व्यवसयाचे भवितव्य आहे. त्यादृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काही राज्यांनी नैसर्गिक शेतीचे नियोजन आणि कार्यपध्दतीही ठरवलेली आहे. महाराष्ट्राने याबाबत अद्यापही कोणतेही धोरण ठरवले नसले तरी (Alibag Farmer) अलिबागच्या सचिन बैकर या तरुण शेतकऱ्याने केलेला सेंद्रीय शेतीचा प्रयोग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.अडीच गुंठ्यातच त्याने मिरचीचे उत्पादन घेतले असले तरी यामध्ये रासायनिक खताचा वापर नाही तर लागवड ते काढणीपर्यंत सेंद्रीय पध्दतीचा अवलंब केला आहे. शेतीक्षेत्र अधिकचे असले तरी केवळ अडीच गुंठ्यातच त्याने हा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. त्याच्या गावरान मिरचीचा ठसका अनुभवण्यासाठी आता जिल्हाभरातील शेतकरी बांधावर येत आहेत.

अशी झाली सुरवात

असंख्य तरुणांप्रमाणे सचिन बैकर हा देखील पुणे येथील एका कंपनीमध्ये जॉब करीत होता. मात्र, 12 एकर शेतीमध्ये अनोखा प्रयोग करावा हा त्याचा मनसुबा होता. नागझरी या गावी परतल्यानंतर शेतामध्ये त्याने एक ना अनेक पीके घेतली. सुरवातीला आंबा, भाजीपाला, चारा पीके अशा विविध पिकांचा प्रयोग केला. मात्र, सेंद्रीय शेतीचे महत्व हे निराळेच. आजही गावराण शेतीमालालाच अधिकची मागणी म्हणून त्याने सेंद्रीय पध्दतीने मिरचीचे उत्पादन घेण्याचा निर्धार केला होता. अनेक पिकांची लागवड आणि अभ्यास झाल्यानंतर त्याने मिरची उत्पादनाचा प्रयोग केला ज्याचे कौतुक आता पंचक्रोशीत होत आहे.

सेंद्रीय खताची निर्मिती अन् मिरचीला डोस

उत्पादन वाढीसाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. मात्र, सचिनने सेंद्रीय खताचा निर्मिती केली आणि याचाच डोस मिरचीला दिला आहे. कुक्कुटपालन करताना काही पक्षी हे मरतात. हे मृत पक्षी, खराब अंडी, शेण, गोमूत्र आणि गूळ याचे मिश्रण करुन एका ड्रममध्ये साठवून ठेवले. अवघ्या काही दिवसांमध्ये सेंद्रीय खताची निर्मिती झाली. चार-पाच दिवसांच्या फरकाने मिरचीसाठी बनवलेल्या वाफ्यामध्ये पाटाच्या पाण्याद्वारे सेंद्रीय खत सोडण्यात आले. या दरम्यानच्या काळात त्याने रासायनिक खताचा वापरच केला नाही. या अडीच गुंठ्यामध्ये 300 किलो मिरचीचे उत्पादन झाले आहे.

कीडीपासून संरक्षणासाठी योग्य नियोजन

मिरचीला कीड-रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या क्षेत्राच झेंडूच्या फुलांची लागवड केली. त्यामुळे मिरचीवर नाही तर फुलावरच कीड बसली गेली. अशाप्रकारे कीडीपासून संरक्षण करण्यात आले आहे. मिरचीचे सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेतल्यामुळे तोडणीनंतर मिरची किमान आठ दिवस तरी सुकत नाही. आतापर्यंत सचिनने तीन वेळा काढणी केली असून 300 किलो उत्पादन मिळाले आहे. एका झाडाला किमान अर्धा किलो मिरच्या लगडत आहेत. त्याचा हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

संबंधित बातम्या :

E-Pik Pahani : ‘ई-पीक पाहणी’तूनच आता खरेदीची होणार नोंदणी, शेतकऱ्यांच्या समस्येवर रामबाण उपाय

Kharif Season : खरिपात खत टंचाई अटळ, आता युरिया उत्पादनात वाढ हाच पर्याय..!

Green Fodder : उन्हाळ्यात चवळी चारा पिकाचा आधार, हिरवा चारा अन् दूध उत्पादनातही वाढ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.