पपईची शेती बदलवू शकते भविष्य, एका हेक्टरमध्ये होईल इतक्या लाखांचे उत्पन्न

आयुर्वेदिक औषधी तयार करण्यासाठी पपईचा उपयोग होतो. शेतकरी पपईची शेती करत असतील तर त्यांना चांगले उत्पन्न मिळेल.

पपईची शेती बदलवू शकते भविष्य, एका हेक्टरमध्ये होईल इतक्या लाखांचे उत्पन्न
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 9:14 PM

नवी दिल्ली : पपई असं एक फळ आहे जे बाजारात वर्षानुवर्ष मिळते. भाजी आणि फळ अशा दोन्ही पद्धतीने याचा वापर केला जातो. काही लोकं कच्च्या पपईची भाजी खाणे पसंत करतात. पपईमध्ये भरपूर पोषक तत्त्व असतात. पपईचे सेवन केल्याने कित्तेक रोग बरे होतात. आयुर्वेदिक औषधी तयार करण्यासाठी पपईचा उपयोग होतो. शेतकरी पपईची शेती करत असतील तर त्यांना चांगले उत्पन्न मिळेल.

पपईमध्ये व्हीटॅमीन सी, व्हिटॅमीन ए, प्रोटीन, कॅल्शियम, शर्करा, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतो. याशिवाय पपईत कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतो. बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथील शेतकरी पपईची लागवड करतात. पपईची शेती वर्षभर केली जाते. पपईसाठी ३८ ते ४४ डिग्री अंश सेल्सिअस तापमान चांगले मानले जाते.

५०० ग्रॅम बियाण्यापासून नर्सरी तयार करावे

मातीत ६.५ ते ७.५ पीएच असल्यास पपईचे उत्पादन चांगले होते. गर्मी झाल्यास पपईच्या उत्पादनावर परिणाम पडतो. पपईमध्ये आंतरपीक म्हणून टमाटर, सांभार, गोबी, वाटाणा अशी आंतरपीकं घेतली जाऊ शकतात. पपईची शेती करायची असेल, तर आधी नर्सरी तयार करावी लागेल. एक हेक्टर जागेत पपई लागवड करत असाल तर ५०० ग्राम बियाणे लागतील. नर्सरीत रोप तयार झाल्यावर शेतात लावता येतील.

हे सुद्धा वाचा

१० ते १३ लाख रुपये उत्पादन

एक हेक्टरमध्ये पपईचे २ हजार २५० रोप लावता येतात. वार्षिक ९०० क्विंटल उत्पादन मिळू शकते. पपई ४० ते ५० रुपये किलोने जाते. ९०० क्विंटल पपई विकून १० ते १३ लाख रुपयांचे उत्पादन घेता येते. याचा अर्थ एकरी चार ते पाच लाख रुपयांची कमाई पपईमधून करता येते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.