Strawberry : चिखलदऱ्याची स्ट्रॉबेरी, मस्त अन् स्वस्तही, पिकतं तिथंच विकतं, शेतकऱ्यांचं कष्टही कमी होतं?
स्ट्रॉबेरी आता विशिष्ट प्रदेशापूरते मर्यादित राहिलेले पीक नाही. अन्यथा स्ट्रॉबेरी म्हणलं की उत्तर भारत आणि राज्यात महाबळेश्वर अशीच नावे समोर येतात. कारण थंड हवेच्या ठिकाणी घेतले जाणारे पीक असले तरी यासाठी पोषक वातावरण करुन मराठवाड्यासारख्या खडकाळ भागातही शेतकऱ्यांनी यशस्वी प्रयोग केले आहेत.
अमरावती : स्ट्रॉबेरी आता विशिष्ट प्रदेशापूरते मर्यादित राहिलेले पीक नाही. अन्यथा (Strawberry Crop) स्ट्रॉबेरी म्हणलं की उत्तर भारत आणि राज्यात महाबळेश्वर अशीच नावे समोर येतात. कारण थंड हवेच्या ठिकाणी घेतले जाणारे पीक असले तरी यासाठी (A nurturing environment) पोषक वातावरण करुन मराठवाड्यासारख्या खडकाळ भागातही शेतकऱ्यांनी यशस्वी प्रयोग केले आहेत. (Vadarbh) आता अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्याची तर स्ट्रॉबेरी उत्पादक शहर म्हणूनच ओळख समोर येत आहे. शेतकरी आता पारंपरिक पिकांपेक्षा नगदी पिकांवर भर देत आहे. यातूनच स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. शिवाय तीन महिन्यात अथक परिश्रम घेऊन उत्पादन पदरी पाडायचे हा निर्धारच शेतकरी करीत आहेत. दोन महिन्याचे योग्य़ नियोजन करुन चिखलदरा आणि नजिकच्या गावातील 50 शेतकऱ्यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यामुळे पीक पध्दतीमध्ये तर बदल झालाच आहे पण शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढले आहे.
‘पिकेल तिथेच विकेल’ या धोरणाचाही फायदा
विदर्भाचे नंदनवन असलेल्या या पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या देशभरातील पर्यटकांना स्ट्ऱॉबेरी भाव आहे. त्यामुळे जिथे पिकते, तिथेच ती खपतेदेखील. स्थानिक बाजारपेठेत 60 ते 70 रुपये प्रति २५० ग्रॅम आणि २८० रुपये प्रतिकिलो दराने विकले जाते . पर्यटक मोठ्या आवडीने ती चिखलदरा शह रातील विविध पानटपरी आणि स्ट्रॉबेरीचा स्टॉलवरून विकत घेतात. आठ वर्षांपासून स्ट्रॉबेरीचे उत्पादन चिखलदरा मध्ये घेतले जाते. जादा उत्पादन झाल्यास चिखलदऱ्याहून निघालेल्या चवदार स्ट्रॉबेरीचा परतवाडा अमरावती ते नागपूर असा प्रवास होतो .
कमी वेळेत अधिकचे उत्पन्न
सध्या शेतकरी हे नगदी पिकावरच भर देत आहेत. स्ट्ऱॉबेरी हा एक उत्तम पर्याय शेतकऱ्यांसमोर असून आता अल्पभूधारक शेतकरी देखील हा प्रयोग करुन पाहत आहेत. स्ट्रॉबेरी लागवडीचा एकरी खर्च 3 लाख रुपये येतो. लागवड केल्यापासून दोन महिन्यांमध्ये उत्पादनाला सुरवात होते. सध्या स्ट्रॉबेरीची तोडणी सुरु असून हा हंगाम मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ आणि बेरोजगारांच्या हाताला कामही यामुळे मिळत आहे. दिवसाकाठी एका एकरातून 30 ते 40 किलो स्ट्रॉबेरीचे उत्पन्न निघत असून त्याची विक्रीही होते हे महत्वाचे आहे.
नागपूर बाजारपेठेचाही आधार
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतले जाते. यामध्ये मोथा , मालाडोह , आमझरी , शहापूर , मसोंडी , खटकाली सलोना गावातील जवळपास 50 शेतकरी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतात. शिवाय अधिकचे उत्पन्न होत असल्याने आता या क्षेत्रामध्ये वाढ देखील होत आहे. क्षमतेपेक्षा अधिकचे उत्पादन झाले तर मात्र, येथील शेतकऱ्यांना नागपूर बाजारपेठेचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, स्थानिक बाजारपेठेतच सरासरी असा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न मिटलेला आहे.
संबंधित बातम्या :
पीएम किसान योजनेतील निधीचा ‘असा’ हा उपयोग, अमरावतीमध्ये 22 कोटी 75 लाखांचा 10 हप्ता
Grape : शेतकऱ्यांची मंदीत संधी, संकटावर मात करुन अखेर द्राक्षांची निर्यात