Summer Crop : उन्हाळी सोयाबीनचा शेवटचा महिना, योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनात होईल वाढ

कृषी विभागाच्या आवाहनानंतर पीक पध्दतीमध्ये झाला पण शेतकऱ्यांनी तो यशस्वीही करुन दाखविला आहे. कधी नव्हे ते उन्हाळी हंगामात शेतशिवार हा हिरवागार दिसत आहे. आतापर्यंत तर सर्वकाही सुरळीत असून शेतकऱ्यांना उत्पादनवाढीची अपेक्षा आहे. सोयाबीनला शेंगा लगडल्या असून शेंगाचे वजन पेलत नाहीय त्यामुळे त्यांनी आपले वजन धरणी मातेवर टाकले आहे.

Summer Crop : उन्हाळी सोयाबीनचा शेवटचा महिना, योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनात होईल वाढ
पाणी पातळी घटल्याने उन्हाळी हंगमातील पीके धोक्यात आहेतImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 5:15 AM

लातूर : (Agricultural Department) कृषी विभागाच्या आवाहनानंतर पीक पध्दतीमध्ये झाला पण शेतकऱ्यांनी तो यशस्वीही करुन दाखविला आहे. कधी नव्हे ते (Summer Season) उन्हाळी हंगामात शेतशिवार सोयाबीनमुळे हा हिरवागार दिसत आहे. आतापर्यंत तर सर्वकाही सुरळीत असून शेतकऱ्यांना उत्पादनवाढीची अपेक्षा आहे. (Soybean Crop) सोयाबीनला शेंगा लगडल्या असून शेंगाचे वजन पेलत नाहीय त्यामुळे त्यांनी आपले वजन धरणी मातेवर टाकले आहे. काही भागात तर शेवटचं पाणी देण्याची तयारी सुरु आहे. असे असतानाच पाट पाण्यातून एकरी 10 किलो म्युरेट ऑफ पोटॅश(पांढरे पोटॅश)चा वापर करावा. म्युरेट ऑफ पोटॅशचा वापरामुळे दाणे चांगले भरतात. पोटॅश ह्या अन्नद्रव्यांवर आपल्या नियोजनात महत्त्व गरजेचे आहे.

दाणे भरण्याच्या अवस्थेत सोयाबीन

अजूनही झाडांची मुळी चालू असल्यामुळे पालाशचे शोषण होऊन उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. सुष्मअन्नद्रव्याची फवारणी घेत असतो त्यामुळे आपणास ह्या फवारणीचा फायदा हा दाणे भरण्याची अवस्थेत होणार आहे. काही क्षेत्रावर सोयाबीनची पाने झाडं वाळू लागतात. आशा वेळी झाडांची मुळी बंद झाली आहे. त्यामुळे अशा वेळी म्युरेट ऑफ पोटॅश(पालाश) एक किलो प्रति एकर ह्या प्रमाणात फवारणी केल्यास जमिनीतून पालाश ह्या अन्नद्रव्यांची अपव्यय होत नाही. शिवाय वरून फवारणी केल्यास त्याचा चांगला परिणाम आपणास मिळतो.

मळणी करताना घ्यावयाची काळजी

सोयाबीनच्या झाडाची पाने वाळू लागताच सोयाबीन मळणीचे नियोजन करणे गरजेचे आहे. शिवाय मळणी सुरु करण्यापूर्वी आपल्या भागात हवामान कसे राहिल याचा अंदाजही घेणे महत्वाचे ठरणार आहे. त्या अनुशंगानेच सोयाबीन काढणीचा कार्यक्रम करावा लागणार आहे. शिवाय आता मजुरांची टंचाई लक्षात घेता योग्यवेळी काढणी आणि मळणी याचे नियोजन करावे लागणार आहे. वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे मळणीपूर्वीच ताडपत्री, बारदान आणि इतर सर्व सामग्री तयार ठेवावी लागणार आहे.

वातावरणातील बदलामुळे वाढला खर्च

एकीकडे उत्पादनात वाढ होत आहे तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे फवारणीचा आणि निगराणीचा खर्च देखील वाढला आहे.सोयाबीन हे पावसाळी पीक आहे पण यंदा उन्हाळी हंगामात त्याचा प्रयोग करण्यात आला आहे. मुबलक पाण्यामुळे हे शक्य झाले असले तरी आता उर्वरीत महिन्याभराचे नियोजन महत्वाचे ठरणार आहे. चार वेळच्या फवारण्या यंदाच्या हंगामात 10 वर गेल्या आहेत. असे असाताना मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन हे कापले जाते. शिवाय सर्व कापणी होईपर्यंत त्याचा एकाच ठिकाणी ढिगारा घातला जातो. पण सध्या वातावरणात बदल सुरु झाला आहे. त्यामुळे काढलेले सोयाबीन हे पावसाने भिजणार नाही याची काळजी शेतऱ्यांना घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारे काळजी घेतल्यावर शेतकऱ्यांचे नुकसान तर टळणार आहेच पण उत्पादनात देखील वाढ होणार आहे.

संबंधित बातम्या :

Sindhudurg : वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर नव्या प्रजातीचे कासव, नावावरुन एकवटले कासवप्रेमी!

Onion Rate : कांदा दराचा वांदा मिटणार! कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची काय आहे रणनिती?

Prices of Pulses : डाळींचे दर शंभरीपार, उत्पादनात घट त्यात महागाईचा तडका

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.