Weather Alert: महाराष्ट्रात 7 मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज
कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्र, व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. Pune IMD alerts rain with thunderstorm

पुणे: राज्यात गेल्या दोन दिवसापासून विविध ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावलीय, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर. या जिल्ह्यात पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा बसलाय, मात्र अजूनही 7 मे पर्यंत हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह जोरदार पूर्व मोसमी पावसाचा इशारा दिला आहे. पावसामुळे ऐन उन्हाळ्यात आता तापमान मोठ्या प्रमाणावर घटलंय. ( Pune IMD alerts rain with thunderstorm in Maharashtra till 7 May)
गारपीट होण्याचा अंदाज
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात निर्माण झाल्यानं मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. गेल्या 24 तासात बुलडाणा इथं सर्वाधिक 30 मी.मी पावसाची नोंद करण्यात आलीये तर पुण्यातही 27 मीमी पावसाची नोंद करण्यात आली
आज पाऊस कुठे पडणार?
आज राज्यात कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्र, व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शेतकऱ्यांना पावसाच्या दृष्टीने गोळा केलेल्या पिकांवर आच्छादन टाकणं गरजेचं आहे.
पुण्यात वीज पडून दोन मुलींचा मृत्यू
अंगावर वीज कोसळून दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक मुलगी गंभीर जखमी झालीय. ही घटना भोर नसरापूर गावातील आहे . सीमा अरुण हिलम (वय 11) आणि ,अनिता सिकंदर मोरे (वय 9) या लहान लेकरांच्या मृत्यू झाला आहे तर चांदणी प्रकाश जाधव ही जखमी आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिघी वस्ती जवळील छोट्या टेकडीवरल खेळत होत्या. पाऊस सुरू झाला म्हणून घराकडे पळत येतानाच वीज पडली. त्यात दोघींचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (3 मे) रोजी घडली. पुण्यातील भोर वेल्हा परिसरात दुपारपासून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडात जोरदार पाऊस झाला.
वीज कोसळत असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन
राज्यात 7 मेपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यासह पुणे घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय, मात्र, या काळात वीज कोसळण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्याची तीव्रता जास्त असल्यानं जीव जाण्याचं प्रमाण आहे, त्यामुळे ढगाळ वातावरणानंतर वीजा कडकत असताना मोकळ्या वातावरणात न फिरण्याचं आवाहन पुणे हवामान वेधशाळेनं केलंय.
Severe weather warnings issued by IMD for Maharashtra for 24 hrs.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/uxnWJRD9Oh
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 3, 2021
संबंधित बातम्या:
Weather alert: राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता; गारपिटीचाही अंदाज
Pune | राज्यात पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा
( Pune IMD alerts rain with thunderstorm in Maharashtra till 7 May)