उत्पादनात वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांची एस आर टी पद्धतीच्या भात लागवडीला पसंती
मागच्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची काम उरकली आहेत.
मावळ : मावळ (PUNE MAVAL) भागात भात पीक लागवडीसाठी (RICE CULTIVATION) समाधानकारक पाऊस सुरू असल्याने, भाताचे आगार असलेल्या पवनमावळात शेतकऱ्यांची खरीप हंगामात इंद्रायणी भात लागवडीसाठी तयारी पुर्ण झाली असून एस आर टी पद्धतीने भात लागवडी पुर्ण केल्या जात आहेत. महाराष्ट्रात (MAHARASHTRA RAIN UPDATE) अनेक ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे. महाराष्ट्रात उशिरा पाऊस दाखल झाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत होता. एस आर टी (SRT) पद्धतीने भाताची लागवड केल्यास उत्पादन अधिक होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी एस आर टी पद्धतीच्या भात लागवडीला पसंती दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी मावळ तालुक्यात कृषी विभागामार्फत मागच्या काही दिवसांपासून प्रशिक्षण घेतली जात आहेत. भात उत्पादन वाढीसाठी तुंग किल्ला परिसरात सगुणा राइस तंत्र (SRT) भात लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण मावळ कृषी अधिकारी शेतकऱ्यांना देत आहेत. या प्रशिक्षणात गादी वाफ्यावर लोखंडीसाच्या साहाय्याने पेरणी करून लागवड केली जात आहे. या पद्धतीमध्ये चिखलनी, पुर्नलागवड करण्याची गरज भासत नाही. त्याचबरोबर उत्पादनात वाढ होते, यामुळे शेतकरी या लागवडीला अधिक पसंती देतात.
मागच्या दोन दिवसांपासून सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पाऊस सुरू आहेत. पावसामुळे माळशेज घाट परिसरातील धबधबे ही ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे त्या भागातला निसर्ग सौंदर्य बहरलाआहे. फुललेला निसर्ग पाहण्यासाठी लोकं तिथं येत आहेत.
हवामानाचा अंदाज चुकत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जुलै महिना सुरू झाला, तरी वाशिम जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. ज्यांच्या पेरण्या झाल्या त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आहे. पेरण्यासाठी उशीर होत असल्याने उत्पादन घटण्याचा धोका वाढला आहे. त्यातच आता पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना आपलं पेरणी केलेलं पीक वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.