शेतात प्राण्यांचा हैदोस, उसाच्या कांड्या कुरतडल्या आणि…, लाखो रुपयांचं नुकसान
शेतकऱ्यांनी नेमका त्रास सहन करायचा आणि तो किती करायचा असा प्रश्न पडायला सुरुवात झाली. ३० डुक्करांच्या कळपाने संपूर्ण पीक खराब केल्याचा प्रकार नुकताचं उजेडात आला आहे.
पुणे : पुण्याच्या भोरमधील (Pune Bhor) उत्रौली गावातील उसाच्या शेताची 30 ते 32 रानडुक्करांच्या (wild boar) कळपान मोठी नासधूस केली असल्याचं पाहावयास मिळत आहे. जवळपास अर्धा एकर उसाची (sugarcane crop destroyed) नासधूस केल्यानं शेतकरी हिम्मत ठोंबरे यांचं लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. वनविभागाने रानडुक्करांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर खराब झालेल्या शेतीचा पंचनामा करुन त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उसाच्या शेतीची अनेक प्राण्यांकडून अशा पद्धतीने नासधूस केली जाते. वैतागलेल्या शेतकऱ्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना हात जोडले आहेत.
भोर तालुक्यातील उत्रौली गावातील रानडुक्करांच्या कळपाने अर्धा एकर शेतात नासधूस केली आहे. शेतकरी हिम्मत ठोंबरे यांनी वनविभागाला सगळी माहिती सांगितली असून वनविभागाने तात्काळ डुक्कराच्या कळपाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपाच्या पेरण्या रखडल्यात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर खरिपाच्या पेरण्या केल्या, ती पीके आता धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी ही पिके करपू लागली आहेत. तर पाऊस न झाल्याने अनेक पिकांवर किडीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
जूलै महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस गायब झाला आहे. ज्या परिसरातून पाऊस गायब झाला आहे. त्या परिसरात पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने जाहीर केली आहे.