Onion Market : ‘नाफेड’ कडूनच शेतकऱ्यांची फसवणूक, कांदा खरेदीच्या नावाखाली असा दुजाभाव
'नाफेड' ही एक बहुराज्य सहकारी संस्था आहे. केंद्र सरकार या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान दर मिळवून देण्याचा प्रयत्न करते. सध्या नाफेड ही संस्था राज्यातील विविध बाजारपेठेतून कांदा खरेदी करीत आहे. मात्र, कांद्याला अगोदर हमीभाव ठरवून द्यावा आणि मगच खरेदी करावी अशी भूमिका कांदा उत्पादक संघटनेने घेतली आहे.
लासलगाव : ‘नाफेड’ ही एक बहुराज्य सहकारी संस्था आहे. (Central Government) केंद्र सरकार या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान दर मिळवून देण्याचा प्रयत्न करते. सध्या (NAFED) नाफेड ही संस्था राज्यातील विविध बाजारपेठेतून कांदा खरेदी करीत आहे. मात्र, (Onion Crop) कांद्याला अगोदर हमीभाव ठरवून द्यावा आणि मगच खरेदी करावी अशी भूमिका कांदा उत्पादक संघटनेने घेतली आहे. तर दुसरीकडे कांदा खरेदीच्या बाबतीत नाफेडकडून दुजाभाव केला जात आहे. शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करताना तो एकाच दरात करणे अपेक्षित आहे. मात्र, नाशिक बाजार समितीमध्ये 12 रुपये किलोप्रमाणे तर अहमदनगर येथे 10 रुपये किलोप्रमाणे खरेदी केली जात आहे. त्यामुळे ‘नाफेड’च्या भूमिकेबाबतच कांदा उत्पादक संघटनेने संशय उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल दर
कांद्याचे दर एका रात्रीतून बदलतात. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचेच होत आहे. त्यामुळे कांद्याला हमीभाव देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक संघटनेकडून केली जात आहे. मात्र, याकडे सरकारचेही दुर्लक्ष होत आहे. सध्या नाफेड ही संस्था शेतकऱ्यांचा कांदा 10 ते 12 रुपये किलोप्रमाणे खरेदी करीत आहे. भविष्यात दर वाढले तर हीच नाफेड संस्था साठवणूकीतला कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल करते. त्यामुळे नाफेड चा उद्देश शेतकऱ्यांच्या हिताचा आहे की, नुकसानीचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ही तर शेतकऱ्यांची फसवणूक
सध्या नाफेडच्या माध्यमातून राज्यातील मुख्य बाजारपेठेत कांद्याची खरेदी सुरु आहे. मात्र, यंदाच्या वर्षात नाफेड किती कांदा खरेदी करतेय किंवा त्याचे दर काय राहतील याबाबत शेतकऱ्यांसह नाफेडचे अधिकारी अनभिज्ञ आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून घेतला जात असलेल्या कांद्याच्या दरातही तफावत आढळून येत आहे. लासलगाव मार्केटमध्ये 12 रुपये किलोप्रमाणे तर अहमदनगर येथे 10 रुपये किलोप्रमाणे खरेदी केली जात आहे. त्यामुळे ही तफावत कशामुळे असा सवाल कांदा उत्पादक संघटनेचे राज्यध्यक्ष भारत डिघोळे यांनी उपस्थित केला आहे.
‘नाफेड’ च्या उद्देश काय ?
‘नाफेड’ ही संस्था केंद्र सरकारच्या माध्यमातून धान्याची खरेदी करुन साठा करते. उर्वरीत काळात धान्याची टंचाई निर्माण झाली किंवा वाजवीपेक्षा अधिकचे दर झाले तर हा खरेदी केलेला माल विक्रीसाठी बाहेर काढला जातो. गेल्या काही महिन्यापूर्वीच कांद्याच्या दरात वाढ होताच हे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने हा साठवणूकीतला कांदा मार्केटमध्ये पाठवून दर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. आता देखील कमी किंमतीमध्ये शेतकऱ्यांचा कांदा घेऊन पुन्हा अधिकच्या दरात विक्री केली जाते असा आरोपही डिघोळे यांनी केला आहे.
संबंधित बातम्या :
Akola : मका पिकाने शेतकऱ्यांना भरभरुन दिले, मुख्य पिकांतून नाहीपण हंगामी पिकातून शेतकऱ्यांचे साधले