Gadchiroli : आदिवासी विकास महामंडळाचा निर्णय एक अन् फायदे अनेक, अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश
काळाच्या ओघात धान उत्पादनात वाढ होत आहे. एकरी विक्रमी उत्पादन काढले तरी खरेदी केंद्रावर नियमाप्रमाणे 9 क्विंटलची खरेदी हे ठरलेलेच होते. त्यामुळे शिल्लक धानाचे करायचे काय असा सवाल उपस्थित केला जात होता. ही समस्या घेऊन शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन, मोर्चे काढून सरकारचा निषेध केला होता. मात्र, मध्यंतरी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरील धान खरेदीच्या मुदतीमध्ये वाढ करण्यासाठी चक्का जाम आंदोलन केले होते.
गडचिरोली : (Paddy Crop) धान पिकाची काढणी होऊनही विदर्भात (MSP) धान खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याच्या तक्रारी ह्या दिवसेंदिवस वाढत होत्या. शेतकऱ्यांची मागणी धान पिकांची झालेली अवस्था पाहून उशिरा का होईना (Gadchiroli Farm) गडचिरोली जिल्ह्यामध्ये धान खरेदी केंद्राला सुरवात झाली आहे. एवढेच नाही तर खरेदी केंद्रावर धानाची अधिक प्रमाणात खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांचा काही अंशी तरी प्रश्न मिटला असला तरी मुख्य मागण्या ह्या प्रलंबितच आहेत.आदिवासी विकास महामंडाळाने एकरी 9 क्विंटल धानाची खरेदी केली जात होती त्या बदल्यात आता एकरी 14 क्विंटलची खरेदी होणार आहे. अशा प्रकारचे आदेश गडचिरोली जिल्ह्यासाठी काढण्यात आले आहेत.
काय होता आदिवासी महामंडळाचा नियम ?
प्रत्येक शेतकऱ्याचे धान हे खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणले जावे या उद्देशाने प्रति एकर केवळ 9 क्विंटल याप्रमाणेच खरेदी केली जात होती. यासाठी सात बारा उताऱ्यावरील नोंदी पाहूनच खेरदी केली जात असे. गेल्या वर्षभरापासून हाच नियम गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आला होता. शिवाय जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्येही याप्रमाणेच सर्वकाही सुरु होते. मात्र, वाढते उत्पादन आणि खरेदीअभावी होत असलेले नुकसान लक्षात घेता नियमात बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश
काळाच्या ओघात धान उत्पादनात वाढ होत आहे. एकरी विक्रमी उत्पादन काढले तरी खरेदी केंद्रावर नियमाप्रमाणे 9 क्विंटलची खरेदी हे ठरलेलेच होते. त्यामुळे शिल्लक धानाचे करायचे काय असा सवाल उपस्थित केला जात होता. ही समस्या घेऊन शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन, मोर्चे काढून सरकारचा निषेध केला होता. मात्र, मध्यंतरी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरील धान खरेदीच्या मुदतीमध्ये वाढ करण्यासाठी चक्का जाम आंदोलन केले होते. शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर तोडगा निघालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आता एकरी 14 क्विंटल धान हे खरेदी केले जात आहे.
हेक्टरी धान खरेदीमध्ये वाढ करावी
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ धान खरेदी केंद्राचाच आधार आहे. सध्या एकरी 14 म्हणजेच हेक्टरी 35 क्विंटल धान खरेदी होत असली तरी हेक्टरी 43 क्विंटलची खरेदी करावी अशी मागणी आहे. याशविाय शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जोपर्यंत हेक्टरी 43 क्विंटलची खरेदी होत नाही तोपर्यंत धान पिकाची साठवणूक करावी. योग्य दर मिळाल्यावरच धान पिकाची विक्री करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या भूमिकेनंतर काय होणार हे पहावे लागणार आहे.