या जिल्ह्यात पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान, काडणीला आलेली पीकं खराब झाल्यामुळे शेतकरी चिंतेत
वीज पडल्याने तीन बैलांचा मृत्यू देखील झाला आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे हे गुरुवार नंतर होणार आहे. कारण होळी धुलीवंदन या सणांची सुट्टी असल्याने हे पंचनामे गुरुवारपासून सुरू होतील असा अंदाज आहे.
धुळे : धुळे (DHULE) जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे चारशे एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Damage crops) झाले आहे. दोन तालुक्यात सुमारे साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि शिदखेडा या दोन्ही तालुक्यात रब्बी पिकांना त्याचा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांच्या आता तोंडाशी आलेला घास फिरवून गेला आहे. काल झालेल्या पावसामुळे शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे तालुक्यातील काही भागांना याचा फटका बसला. यात गहू, हरभरा, केळी, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरपूर (SHIRPUR) तालुक्यात साधारण दोनशे हेक्टर वरील पिकांना त्याचा फटका बसला असून वीस लाखाचे नुकसान झाले आहे.
तीन बैलांचा मृत्यू
वीज पडल्याने तीन बैलांचा मृत्यू देखील झाला आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे हे गुरुवार नंतर होणार आहे. कारण होळी धुलीवंदन या सणांची सुट्टी असल्याने हे पंचनामे गुरुवारपासून सुरू होतील असा अंदाज आहे.
धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे. गहू आणि हरभरा पिकांचे नुकसान झाले असून, केळीच्या फळबागा देखील उद्धवस्त झाल्या आहेत. केळीच्या बागांना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. आता शासनाने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. जिल्ह्यात सकाळपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अनेक ठिकाणी तूरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. या पावसामुळे पिकांचं मोठ नुकसान झालं आहे.
मालेगाव शहरात मुसळधार
विजाचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने मनमाड शहर परिसराला काढले झोडपून काढले. सुरुवातीला झाला जोरदार पाऊस त्यानंतर रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. अचानक झालेल्या पावसामुळे शेतात साचले आहे. गहू, कांदा, हरभरा यासह इतर पिकांचे झाले मोठे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आहे.