मुंबई : शेती मालाच्या दरावरून शेतकऱ्यांची सातत्याने निराशा झालेली आहे. उत्पादनाबरोबरच बाजारभाव मिळणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. योग्य बाजारपेठ मिळावी याकरिता सरकारचे देखील कायम प्रयत्न राहिलेले आहेत. त्याच अनुशंगाने इसा योजनेअंतर्गत देशाच्या एका भागात रेल्वेने कृषी उत्पादने पाठविली जात आहेत. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र (Maharashtra) आणि बिहार (BIhar) दरम्यान 600 वी किसान रेल्वे सेवाही सुरू करण्यात आली आहे. (Kisan Railway) या रेल्वे सेवेचा लाभ हा दोन्ही राज्यांना होणार आहे.
महाराष्ट्रात कांदा, ऊस, द्राक्षे आणि संत्र्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होते तर बिहारमध्ये भात मका आणि मोहरी ची लागवड केली जाते. त्यामुळे दोन्ही राज्ये या कृषी उत्पादनांची देवाणघेवाण करतील. या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहेच शिवाय स्थानिक बाजारपेठेत ही उत्पादने उपलब्ध होणार आहेत. या गोष्टीच्या अनुशंगाने रेल्वे मंत्रालयाने देशातील 600 व्या रेल्वे सेवेला सुरवात केली आहे. ही रेल्वे महाराष्ट्रातील सांगोला ते बिहारमधील मुझफ्फरपूरपर्यंत धावणार आहे.
किसान रेल्वे यात्रेत फळे आणि भाज्यांच्या वाहतुकीत सरकारकडून 50% अनुदान दिले जाते. किसान रेल्वे सेवा 7 ऑगस्ट 2020 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची उत्पादने राष्ट्रीय बाजारपेठेत नेण्यासाठी रेल्वे वाहतुकीचा वापर करण्यात आला. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. यापुर्वी फळे, भाज्या, फळे ही वेळेत न पोहचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते ते आता टळले आहे. सर्व शेतामाल हा वेळेत जात असल्याने दरही चांगला मिळत आहे.
किसान रेल्वेद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत आणि मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दूरवरच्या भागातून शेतकऱ्यांचे उत्पादन घेऊन शेतकरी रेल्वे मोठ्या शहरांमध्ये पोहोचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.
फळे : आंबा, केळी, पेरू, किवी, लिची, पपई, हंगामी, केशरी, किनू, लिंबू, अननस, डाळिंब, फणस, आवळा आणि नाशपातीच्या वेळेला इतर फळांच्या वाहतुकीतून सूट दिली जाते.
भाज्या : कडू गौर, वांग्याची, सिमला मिरची, गाजर, फुलकोबी, फ्रेंच बीन्स, हिरव्या मिरच्या, भेंडी, काकडी, मटार, लसूण, कांदा, बटाटे आणि टोमॅटो सह इतर भाज्यांच्या वाहतुकीसाठी भाडे सूट देण्यात आली आहे.
मांस, अंडी, चिकन, मासे आणि दुग्धजन्य पदार्थ
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळविण्यासाठी रेल्वेकडे नोंदणी करावी लागते. हे आता देशातील ६० मार्गांवर कार्यरत आहे. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. (Railways running between Maharashtra and Bihar, farmers benefit greatly)
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : लवकरच जमा होणार किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता, 1.58 लाख कोटींची तरतूद
खरीप अंतिम टप्प्यात तरीही कर्जवाटप अर्धवटच, बँकांची अनास्था शेतकऱ्यांच्या मुळावर
मराठवाड्यातील स्थिती : नुकसान 8 जिल्ह्यात पंचनामे 3 जिल्ह्यातीलच पूर्ण