Nandurbar : हवामान विभागाचा अंदाज अन् कृषी विभागाचा सल्ला सर्वकाही व्यर्थ, दुबार पेरणीचे संकट मात्र कायम
जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात तीन लाख हेक्टर खरीप पेरण्या होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तर आतापर्यंत एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्या रखडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी झालेल्या पावसावर पेरण्या आटोपल्या होत्या त्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट ही उभे राहिले आहे.
नंदुरबार : राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली तरी नंदुरबारकरांना मात्र अपेक्षित पावसाची प्रतिक्षा आहे. (Meteorological Department) हवामान विभागाचा अंदाज राज्यासाठी आशादायी ठरला असला तरी (Nandurbar District) नंदुरबार जिल्हा मात्र अपवाद राहिला आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा तर कोरडा गेलाच आहे पण दुसऱ्या आठवड्यातही पावसाने दडी दिली आहे. जिल्ह्यात 77 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला नसल्याने केवळ 35 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे वाढीव उत्पादन तर सोडाच पण अपेक्षित (Kharif Sowing) पेरण्यादेखील होतील की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे हवामान विभागाचा अन् कृषी विभागाचा सल्ला हा जणूकाही नंदुरबारसाठी आहे का नाही असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली त्या क्षेत्रावरील पिकेही धोक्यात आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस जुलैमध्ये उघडीप
जिल्ह्यात 10 जूननंतर खरीप पेरणीला सुरवात होत असते. यंदा मात्र, 10 जुलै उजाडत आला तरी केवळ 35 टक्के क्षेत्रावरच खरीप पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत सरासरी एवढाही पेरा झालेला नाही. नंदुरबार जिल्ह्यात जून महिन्यात पावसाची 65% ची तुट आहे. तर जुलै महिन्याचा पहिला आठवडाही काही अंशी कोरडा गेला असेच म्हणावे लागेल. जिल्ह्यातील कोणत्याही महसूल मंडळात 77 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्या नसल्याची नोंद आहे. त्यामुळे कृषी विभागाचे नियोजन आणि शेतकऱ्यांचे परिश्रम वाया जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अल्पशा पावसावर पेरणीचे धाडस
जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात तीन लाख हेक्टर खरीप पेरण्या होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तर आतापर्यंत एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्या रखडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी झालेल्या पावसावर पेरण्या आटोपल्या होत्या त्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट ही उभे राहिले आहे. अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्या रखडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
हवामान खात्याच्या वतीने जिल्ह्यात तीन ते चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर कृषी विभागाने योग्य ती ओल जमिनीत आल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन केले आहे. आता वेळेत आणि अपेक्षित पाऊस पडला तरच खरीप हंगामातील पेरण्या होतील असे चित्र आहे. आतापर्यंत हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता. पण नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामच संकटात सापडलेला आहे.