Marathwada : पाऊस नेमका गेला कुठे..? मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाचीही हुलकावणी

मान्सूनचे राज्यात आगमन झाले असले तरी पावसाची गती ही धिमी आहे. शिवाय त्यामध्ये सातत्य नसल्याने अजूनही पेरणीसाठी अपेक्षित पाऊसच झालेला नाही. उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामाच महत्वाचा असताना पावसाच्या या लहरीपणामुळे पेरणी करावी का नाही अशा सभ्रमात राज्यातील शेतकरी आहे. शिवाय कृषी आयुक्त धिरज कुमार यांनी 75 ते 100 मि.मी पावासाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करुन नये असा सल्ला दिला आहे.

Marathwada : पाऊस नेमका गेला कुठे..? मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाचीही हुलकावणी
खरीप पेरण्या करण्याची वेळ असताना आता मराठवाड्यात शेती मशागतीची कामे करावी लागत आहेत.
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 2:41 PM

औरंगाबाद : वेळेपूर्वी दाखल होणारा (Monsoon) मान्सून यंदा नियमित वेळेपेक्षा तीन दिवस उशीराने दाखल झाला. शिवाय आगमन होताच कोकणातच मान्सूनच्या मार्गक्रमणात अडथळा निर्माण झाल्याने पुन्हा चार दिवसाचा खंड. राज्यात पावासाचा लपंडाव सुरु असला तरी (Marathwada) मराठवाड्यात अजूनही पावसाची एंन्ट्रीच झालेली नाही. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही भाग वगळता उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्वही पाऊस दाखल झालेला नाही. त्यामुळे पेरण्या तर सोडाच पण अजून शेत शिवारात (Pre-sowing cultivation) पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. त्यामुळे पेरण्या तर लांबणीवर पडणारच आहेत. पण अशा परस्थितीमध्येही शेतकऱ्यांनी घाईगडबडीत चाढ्यावर मूठ ठेऊ नये असाच सल्ला दिला जात आहे. मराठवाड्यात केवळ नांदेड जिल्ह्यातील काही भागात कापूस लागवड झाली आहे. अन्य भागात शेतकऱ्यांना अपेक्षित पावसाची प्रतीक्षा ही कायम आहे.

पेरणीला घेऊन शेतकरी चिंतेत

मान्सूनचे राज्यात आगमन झाले असले तरी पावसाची गती ही धिमी आहे. शिवाय त्यामध्ये सातत्य नसल्याने अजूनही पेरणीसाठी अपेक्षित पाऊसच झालेला नाही. उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामाच महत्वाचा असताना पावसाच्या या लहरीपणामुळे पेरणी करावी का नाही अशा सभ्रमात राज्यातील शेतकरी आहे. शिवाय कृषी आयुक्त धिरज कुमार यांनी 75 ते 100 मि.मी पावासाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करुन नये असा सल्ला दिला आहे. त्यामुळे बी-बियाणे खरेदी करुन ठवले असताना अजून जमिनीत गाढण्यासाठी किती वेळ वाट पाहावी लागणार अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

नेमकी पावसाची कशामुळे हुलकावणी?

ज्या वेगाने 10 जून रोजी पाऊस तळकोकणात दाखल झाला तो वाऱ्याचा वेग कायम पुढे राहिलाच नाही. शिवाय पावसळ्यापूर्वी वाऱ्याचा वेगही यंदा मंदावलेला होता. म्हणजेच एप्रिल, मे महिन्यातील वाऱ्याच्या वेगाचा परिणाम आता सध्याच्या पावसावर होत असल्याचे कृषी हवामान तज्ञ डॉ. रामेश्वर साबळे यांनी सांगितले आहे. मे महिन्यात वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 8 किमी असल्यास पावसामध्ये सातत्य राहते पण यंदा वाऱ्याचा वेग हा 1 ते 2 किमी असाच राहिला होता. त्यामुळेच जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचेही डॉ. साबळे यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

उशीराने पेरणी झाल्यास काय करावे ?

खरिपाच्या पेरणीसाठी सतर्क असलेल्या शेतकऱ्यास प्रतीक्षा आहे ती अपेक्षित पावसाची. मात्र, मराठवाड्यात असून पावसाने सुरवातच केली नसल्याने पेरण्या लांबणीवर पडणार हे निश्चित मानले जात आहे. मराठवाड्यात सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. त्यामुळे चाढ्यावर मूठ ठेवण्यास उशीर झाला तर शेतकऱ्यांनी बियाणे वाणामध्ये बदल करणे अपेक्षित आहे. सोयाबीनमध्ये असेही बियाणे आहेत जी कमी कालावधीतीमध्येही अधिकचे उत्पादन देतात. यामध्ये जे एस -20034, जे एस 95-60, जेएस-93-05, पीडीकेयू अंबा, एनआरसी 142, एनआरसी 138 या वाणांचा समावेश होतो. त्यामुळे पावसाचा अंदाज आणि सातत्या हे पाहूनच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवण्याचा सल्ला कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.