Rain News Today : या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्यामुळे शेतमाल सुरक्षित ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन
कापणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, साठवणुकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टिक ताडपत्रीने झाकून ठेवावा
गणेश सोळंकी, खामगाव : भारतीय हवामान खात्याने (Meteorological Department of India) वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात आज तुरळक आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस (light rain) पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर पुढचे तीन दिवस हवामान कोरडे राहून अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे बुलढाणा शेतकरी बांधवांनी कापणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, साठवणुकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टिक ताडपत्रीने झाकून ठेवावा, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणायांच्या कडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे वीस दिवसांपासून साखळी उपोषण
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील शेतकऱ्यांची शेती जिगाव प्रकल्पात गेली आहे. तर उरलेली गावाशेजारील गावठाणची चांगली शेती सुद्धा आता रोटी या गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून प्रस्तावीत करण्यात आली असल्याचं शेतकरी सांगत आहेत. या शेती प्रस्तावाला निमगाव येथील शेतकऱ्यांनी विरोध केला असून या गावातील शेतकऱ्यांना तेव्हढीच चांगली शेती शिल्लक राहिली असून दुसऱ्या ठिकाणी रोटी गावाच्या पुनर्वसनासाठी जमीन पहावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे या प्रस्तावचा विरोधात निमगाव येथील शेतकरी मागील वीस दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. जोपर्यंत हा प्रस्ताव रद्द करण्यात येत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली.