Special Story | अर्ध्या एकरात सुरु केलेल्या नर्सरीचा सात एकरावर विस्तार; 10 लाखांचा नफा मिळवणाऱ्या भंडाऱ्याच्या शेतकऱ्याची यशोगाथा

| Updated on: Jan 30, 2021 | 8:34 AM

राजू भोयर यांना वार्षिक 20 लाखांचं उत्पन्न मिळतंय तर उत्पादन खर्च जाऊन त्यांना वर्षाकाठी 10 लाखांचा फायदा होतं आहे. Raju Bhoyar flower Nursery

Special Story | अर्ध्या एकरात सुरु केलेल्या नर्सरीचा सात एकरावर विस्तार; 10 लाखांचा नफा मिळवणाऱ्या भंडाऱ्याच्या शेतकऱ्याची यशोगाथा
राजू भोयर नर्सरी
Follow us on

भंडारा: राज्याच्या विविध भागातील शेतकरी वेगळ्या वाटा चोखाळताना दिसत आहेत. भंडाऱ्यातील (Bhandara) राजू भोयर (Raju Bhoyar) यांनी अर्धा एकर शेतातून नर्सरीचा सुरु केलेला प्रवास आता सात एकरांवर पोहोचला आहे. सात वर्षापूर्वी सुरु झालेल्या नर्सरीचा प्रकल्प सात एकरात विस्तारला आहे. राजू भोयर यांना वार्षिक 20 लाखांचं उत्पन्न मिळतंय तर उत्पादन खर्च जाऊन त्यांना वर्षाकाठी 10 लाखांचा फायदा होतं आहे. राजू भोयर यांच्याकडे काम करणाऱ्या मंजुरांना देखील कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध झालाय. (Raju Bhoyar Bhandara farmer success story in flower Nursery)

वडिलोपार्जित शेतीकडून नर्सरीकडे

भंडारा जिल्ह्यातील पालोरा येथील राजू भोयर या शेतकऱ्यांनी अर्धा एकर शेतीमधून नर्सरीचा प्रवास सुरु केला होता. मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील शेतकरी राजू भोयर यांच्याकडे वडिलोपार्जित शेती होती. मात्र, शेतीमध्ये पारंपरिक धान पीक लागवड करत असताना त्यांना लागवड खर्चही निघत नसल्याने त्यांच्यावर सावकारांचा कर्ज वाढत होतं. त्यामुळे यातून बाहेर निघण्यासाठी काहीतरी करण्याच्या विचारात होते. त्यातून राजू भोयर नर्सरीकडे वळले.

2013 मध्ये नर्सरीला सुरुवात

सावकारांच्या वाढत्या त्रासातून मुक्त होण्यासाठी राजू भोयर यांनी नर्सरी सुरु करण्याचा निर्णय घेतला. भोयर यांनी सुरुवातीला त्यांनी अर्धा एकर शेतीवर 2013 मध्ये ओम रोझ नर्सरी ही फुल झाडांची नर्सरी तयार केली. स्वतः व काही मजुरांच्या साहाय्याने त्यांनी हा प्रयोग केला. सुरुवातीला स्वतःच मोठ्या शहराच्या ठिकाणी जाऊन फुलांची झाडे विक्री करत होते. हळूहळू त्यांना या नर्सरीत फायदा मिळू लागल्याने त्यांनी आपली नर्सरी ही सात एकरांपर्यंत वाढवली आहे.

ओम रोझ नर्सरीत 30 जणांना रोजगार

राजू भोयर यांच्या ओम रोझ नर्सरीत 50 प्रजातीचे झाडे आहेत. तर, भोयर यांनी आपल्या नर्सरीत गावातील 30 लोकांना रोजगार सुद्धा दिला आहे. नर्सरीतून आता आंध्र प्रदेश ते पश्चिम बंगालपर्यंत फूल झाडांच्या रोपांची विक्री केली जाते. भोयर यांना आता झाडे विकायला जावे लागत नाही. भंडारा, गोंदिया,बालाघाट येथील व्यावसायिक गाड्या भरून फुलांची झाडे नेत आहेत.

2013 मध्ये अवघ्या अर्धा एकरावर राजू भोयर यांनी सुरु केलेला प्रवास आता सात एकरापर्यंत पोहोचला आहे. यातून त्यांना वार्षिक 20 लाखांचं उत्पन्न मिळत आहे. तर, लागवड मजुरी, खतं ,बियाणे यांसाठीच वार्षिक 10 लाख रुपये खर्च येत असून 10 लाखांचा फायदा मिळत आहे.

सातवर्षांमध्ये सात एकरावर नर्सरीचा विस्तार

राजू भोयर त्यांच्या सात वर्षांच्या प्रवासाविषयी बोलताना सांगतात की दरवर्षी नर्सरीचा विस्तार होत आहे. अर्ध्या एकरातून सुरु केलेल काम आता सात वर्षांपर्यंत पोहोचलं आहे. त्यांच्या नर्सरीत फुलांच्या रोपांसह फळ झाडांची रोपं मिळतात. चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया येथील व्यापारी नर्सरीमध्ये येऊन रोपं घेऊन जातात, असं राजू भोयर यांनी सांगितलंय. उषा बोन्द्रे या राजू भोयर यांच्या नर्सरीत मजुरी करतात. वर्षभर रोजगार मिळत असल्यानं येथे काम करत असल्याचं त्या सांगतात. प्राण टेम्भूरकर हे गेल्या ५ वर्षांपासून राजू भोयर यांच्या नर्सरीत सहकुटुंब कामाला येतात. नर्सरीत वर्षभराचं काम मिळत. असल्याचं त्यांनी सांगितलेय. आमच्या सारख्या सामान्य माणसांना नर्सरीमुळे कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध झाल्याचं ते सांगतात. शेती परवडणारी नाही अशी नेहमी शेतकऱ्यांची ओरड असते, मात्र शेतीमध्ये योग्य नियोजन केलं तर शेतीमधून सुद्धा आर्थिक उन्नती साधता येते हेच या शेतकऱ्यांनी दाखवून दिल आहे.


संबंधित बातम्या:

झुकिनी…. ‘फायद्याचा’ विदेशी भाजीपाला, नांदेडच्या शेतकऱ्याने बक्कळ कमावले!

पाणी कमी असलं म्हणून काय झालं, शेतकरी किसन भोसलेंचा ‘हा’ प्रयोग देऊ शकतो लाखोंचा नफा


(Raju Bhoyar Bhandara farmer success story in flower Nursery)