साखर कारखानदारांना पैसे देता मग शेतकऱ्यासांठी आखडता हात का?; राजू शेट्टींचा उद्धव ठाकरेंना सवाल
साखर कारखानदारांना शासनाच्या तिजोरीत पैसा नसाताना थकहमी दिली जाते. शेतकरी अडचणीत असताना हात आखडता का?,असा सवाल राजू शेट्टींनी केला आहे. Raju shetti asked questions to uddhay thackeray about compensation of crop loss
पंढरपूर : राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. सरकार साखर कारखानदारांना मदत करण्यासाठी तिजोरीत पैसे नसताना तातडीने थकहमी देते. मग, शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता का? असा सवाल राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केला आहे. राजू शेट्टी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. (Raju shetti asked questions to uddhay thackeray about compensation of crop loss )
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 50 हजार कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रूपयांची आर्थिक मदत करा अन्यथा आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.
पंढरपूर आणि परिसरात अतिवृष्टी झाली आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राजू शेट्टी आज पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी चिंचोली भोसे, भटुंबरे आदी ठिकाणी जाऊन नुकसानाची पाहणी केली. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारनेही राज्याला मदत करावी, अशी मागणी केली.
केंद्राकडे राज्याचं देणं बाकी आहे. ती मदत आली तर मदतीची गरज पडणार नाही: उद्धव ठाकरे
दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करताना आम्हाला राजकारण करायचं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्राकडे राज्याचं देणं बाकी आहे. ती मदत आली तर मदतीची गरज पडणार नाही. येणं आलं तर हात पसरावं लागणार नाही. विरोधकांनी त्यावर राजकारण करत बसू नये. शेतकऱ्यांसाठी जे जे करावं लागेल ते करू, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. दोन-चार दिवस दौरे करणार आहे. माहिती घेत आहे. त्यानंतर शक्य तेवढी मदत करू शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
संबंधित बातम्या :
CM Uddhav Thackeray Solapur Visit Live | मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना मदतीचे चेक वाटप
हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
(Raju shetti asked questions to uddhay thackeray about compensation of crop loss )