Raju Shetti On Sharad Pawar: शरद पवार ऊस उत्पादकांना आळशी म्हणालेच कसे? त्यांच्या ज्ञानाबाबत माझा गैरसमज, राजू शेट्टींचे आक्षेप काय?
वाढत्या उसाच्या क्षेत्रावर शरद पवारांनी ऊस उत्पादकांची कान उघडणी तर केलीच पण उसाऐवजी इतर पिकांचे उत्पादन घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ज्यांचा शेती विषयी गाढ अभ्यास आहे शिवाय ते 10 वर्ष कृषिमंत्री राहिलेले आहेत असे असताना त्यांनी हे विधान केल्याने सोशल मिडियामधूनही त्यांच्या या विधानावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तर याबाबत मोठे विधान केले आहे.
उस्मानाबाद : वाढत्या उसाच्या क्षेत्रावर शरद पवारांनी (Sugarcane) ऊस उत्पादकांची कान उघडणी तर केलीच पण उसाऐवजी इतर (Crop Change) पिकांचे उत्पादन घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ज्यांचा शेती विषयी गाढ अभ्यास आहे शिवाय ते 10 वर्ष कृषिमंत्री राहिलेले आहेत असे असताना त्यांनी हे विधान केल्याने सोशल मिडियामधूनही त्यांच्या या विधानावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तर याबाबत मोठे विधान केले आहे. शरद पवार यांना (Agricultural) कृषी क्षेत्राची सर्व माहिती आहे. यामध्ये त्यांचा गाढ अभ्यास आहे असे मी सुध्दा समजत होतो पण त्यांच्या या विधानानंतर तो माझा मोठा गैरसमज असल्याची प्रचिती आल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. उस्मानाबाद येथील आयोजित पत्रकार परिषदेच ते बोलत होते.
काय म्हणाले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार?
सध्या सबंध राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गाजत आहे. वाढत्या क्षेत्रामुळेच ही समस्या उद्भवलेली आहे. वाढत्या क्षेत्राबद्दल शरद पवार यांनी ऊस उत्पादकांची कान उघडणी केली होती. उसाचे पीक घेणे हे आळशी शेतकऱ्याचे काम आहे. कारण ऊस लागवड केली की मशागतीशिवाय कोणतेच काम नसते शिवाय हे वर्षभराचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाबरोबर सोयाबीन, कापूस या हंगामी पिकाचेही उत्पादन घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन उसात झालेले नुकसान इतर पिकांमधून भरुनन काढता येणार आहे. त्यामुळे त्यांनी ऊस घेणारे शेतकरी आळशी असल्याचे म्हटले होते.
उसाच्या शाश्वत दरामुळेच शेतकऱ्यांची प्रगती
शरद पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणत्या उद्देशाने हे विधान केले हे माहित नाही पण शेती व्यवसयामध्ये उसाचे काय महत्व आहे ते शेट्टी यांनी सांगितले. आता काळाच्या ओघात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे उसाला दर जरी कमी असला तरी हे पीक शाश्वत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याकडे कल वाढत आहे. इतर पीके पदरी पडेपर्यंत त्याचे काही खरे नाही. याचा प्रत्यय यंदाच आला आहे. त्यामुळे या सर्वात मोठ्या नगदी पिकामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल झाला आहे. याचा विसर त्यांना पडला असेलही असे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
कारखानदारांचे हित जोपसण्यासाठीच खटाटोप
केवळ साखर कारखान्यांना अधिकचा फायदा व्हावा म्हणून ऊसशेतीला शाश्वत दर देण्याचे धोरण हे राबवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हितापेक्षा अनेकांना कारखानदारांच्या हिताचा प्रश्न पडला होता. शेतकऱ्यांपेक्षा अधिक महत्व हे साखर कारखानदारांना देण्याचे काम हे शरद पवार यांनी केल्याचा आरोपहा यावेळी राजू शेट्टी यांनी केला.
शरद पवारांच्या ज्ञानाबद्दल माझा गैरसमज, त्या वक्तव्यावर राजू शेट्टींचे स्पष्टीकरण… pic.twitter.com/h2cWx7Lr89
— TV9 Marathi Live (@tv9_live) April 19, 2022
संबंधित बातम्या :
PM kisan Yojna : 11 व्या हप्त्याची उत्सुकता शिघेला, तक्रार निवारण्यासाठीही सरकारने केली सोय
Marathwada : 3 लाख क्विंटल हरभऱ्याला हमीभावाचा ‘आधार’, कृषी विभागानेच केली शेतकऱ्यांची अडचण..!
Osmanabad : ‘स्वाभिमानी’ चे ठरले..! दिवसा वीजेसाठी आता न्यायालयीन लढा, 1 मे रोजी महत्वाची भूमिका