Hapus Mango : फळांचा राजा ‘ऑनलाईन’द्वारेही मिळणार, रत्नागिरीत अनोख्या उपक्रमाला दणक्यात सुरवात

ऑनलाईनचा जमाना आहे आणि त्यानुसारच बदल केला तर स्पर्धेच्या युगात टिकून राहता येणार आहे. आतापर्यंत विविध वस्तूंचे ऑनलाईनच्या माध्यमातून मार्केटींग आणि विक्री केली जात होती. यामध्ये आता फळांचा राजाचीही एंन्ट्री होत आहे. अहो खरचं कारण रत्नागिरी हापूस हा अॅमेझॉनवरही आता मिळणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे थेट आंबा उत्पादकांकडून आंबा खरेदीला अ‍ॅमेझॉनने सुरवात केली आहे.

Hapus Mango : फळांचा राजा 'ऑनलाईन'द्वारेही मिळणार, रत्नागिरीत अनोख्या उपक्रमाला दणक्यात सुरवात
रत्नागिरीचा हापूस आंबा आता अ‍ॅमेझॉनवरही मिळणार आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 11:36 AM

रत्नागिरी :  (Online) ऑनलाईनचा जमाना आहे आणि त्यानुसारच बदल केला तर स्पर्धेच्या युगात टिकून राहता येणार आहे. आतापर्यंत विविध वस्तूंचे ऑनलाईनच्या माध्यमातून मार्केटींग आणि विक्री केली जात होती. यामध्ये आता फळांचा राजाचीही एंन्ट्री होत आहे. अहो खरचं कारण  (Ratnagiri Hapus) रत्नागिरी हापूस हा (Amazon) अॅमेझॉनवरही आता मिळणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे थेट आंबा उत्पादकांकडून आंबा खरेदीला अ‍ॅमेझॉनने सुरवात केली आहे. यामुळे ग्राहकांना आता घरबसल्या रत्नागिरी आंब्याची चव चाखता येणार आहे. शिवाय यंदा उत्पादनात घट झाल्याने हापूस आंबा मिळणे दुरापस्त झाले होते. पण आता अ‍ॅमेझॉन यामध्ये उतरले असल्याने मुख्य शहरांमध्ये ग्राहकांपर्यंत हापूस आंबा पोहचवला जाणार आहे. यामुळे उत्पादकांना योग्य दर आणि ग्राहकांना खात्रीशीर भौगेलिक मानांकन मिळालेलाच आंबा मिळणार आहे.

संकलन केंद्रावरच आंबा खरेदीची सुविधा

शेतकऱ्यांचा हापूस आंबा अ‍ॅमेझॉन कंपनीला मिळावा याकरिता रत्नागिरी येथील मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. याची सुरवात झाली आहे. आरंभीलाच या संकलन केंद्रावर 12 शेतकऱ्यांकडून 600 डझन आंब्याची खरेदी केली आहे. 185 ते 220 ग्रॅमपर्यंतचे पिकलेले फळ प्रतिडझन 900 रुपयांनी खरेदी करण्यात आले.रत्नागिरीतील आंबा संकलन केंद्राचे उद्घाटन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, आंबा बागायतदार समीर दामले, प्रमुख व्यवस्थापक राजेश प्रसाद, विवेक धवन, सुजय हेगडे, नरेंद्र जवळे यांच्यासह बागायतदार उपस्थित होते.

राज्यात अ‍ॅमेझॉनचे चौथे केंद्र उभारले

ऑनलाईनच्या माध्यमातून ग्राहकांना हापूस आंबा मिळावा हे धोरण ठेऊन या कंपनीने ही अनोखी सुरवात केली आहे. अ‍ॅमेझॉनचे अशा पध्दतीचे महाराष्ट्रातील हे चौथे तर देशभरातील सातवे केंद्र आहे. त्यामुळे येथील केंद्राच्या माध्यमातून मुंबई, पुणे यासारख्या मुख्य बाजारपेठेत आंब्याची विक्री केली जाणार आहे. या उपगनरामध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यावर भविष्यात कानाकोपऱ्यातच नव्हे तर निर्यातही केला जाणार असल्याचे संकलन केंद्राच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

खरेदी आणि जागेवर पेमेंट

अ‍ॅमेझॉन कंपनीचे प्रतिनीधी हे शेतकऱ्यांच्या आंब्याची जागेवर खरेदी करणार आहेत. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाही दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूकीचा प्रश्न मिटणार आहे. शिवाय प्रत्येक आंब्याच्या पेटीवर भौगोलिक मानांकन असल्याचे प्रमाणपत्र लावावे लागणार आहे. आठवड्याभरानंतर बिटकी आंबाही खरेदी केली जाईल असे प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या:

Milk : दर वाढले अन् उत्पादन घटले, वाढत्या उन्हात दूध उत्पादनवाढीसाठी काय काळजी घ्यावी ?

Nanded : उन्हामुळे गावरान काकडीला विक्रमी दर, शेतकऱ्यांनीच घेतलं Market ताब्यात

Central Government : शेतकऱ्यांचे उत्पन्न करण्यासाठी सरकारचे काय आहे धोरण, कृषीमंत्र्यांनीच सांगितला Plan..!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.