ऊस बिलातून वीजबिल वसुलीचे पुन्हा संकेत, शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, काय म्हणाले सहकार मंत्री ?

मध्यंतरी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीजबिल वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला तीव्र विरोध होत असल्याने अद्यापपर्यंत अशा प्रकारे अडवणूक करुन वीजबिल वसुली झालेली नाही पण सहकार मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या सुचक विधानामुळे शेतकऱ्यांची पुन्हा धाकधूक वाढलेली आहे.

ऊस बिलातून वीजबिल वसुलीचे पुन्हा संकेत, शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, काय म्हणाले सहकार मंत्री ?
बाळासाहेब पाटील
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 3:49 PM

सातारा : सध्या कृषीपंपाची वाढती थकबाकी हा चर्चेचा विषय बनलेली आहे. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे तर दुसरीकडे महावितरणकडून वीजबिल वसुलासाठी (Agricultural Pump) कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीत केला जात आहे. अशातच मध्यंतरी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीजबिल वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला तीव्र विरोध होत असल्याने अद्यापपर्यंत अशा प्रकारे अडवणूक करुन वीजबिल वसुली झालेली नाही पण (Minister of Co-operation) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या सुचक विधानामुळे शेतकऱ्यांची पुन्हा धाकधूक वाढलेली आहे. कारण सातारा येथील एका आयोजित कार्यक्रमात त्यांनी ऊस बिलातून वीजबिल वसुली हा शेवटचा पर्याय आहे. त्या दरम्यान, (Farmer) शेतकऱ्यांच्या तक्रारीचे नेमके स्वरुप काय आहे हे पाहूनच काम केले जाईल असे सांगितले आहे. शिवाय शेतकऱ्यांची याबाबत तयारी असेल तर तो अधिकार शेतकऱ्यांना आणि संबंधित संस्थेला असल्याचे सांगत यामधील सस्पेंन्स कायम ठेवलेला आहे. त्यामुळे भविष्यात गरज पडली तर अशाप्रकारे वीजबिलाची वसुलीही होऊ शकते असेच संकेत त्यांनी दिले आहेत. सातारा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदभावना दिवस या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे.

शेतकऱ्यांची तक्रार पाहून निर्णय

थकीत वीजबिल वसुली झाली नाही तर ऊसाच्या बिलातूनच वसुली हाच पर्याय आहे. मात्र, यासंबंधी शेतकऱ्यांची तक्रार काय आहे हे पाहूनही निर्णय होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. मात्र, ऊसबिलातून वसुली होणारच असल्याचे संकेत त्यांनी अस्पष्ट दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार असल्याचे चित्र आहे.

राज्य सरकारच्या निर्णयाला शेतकरी संघटनांचा विरोध

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आहे. केवळ ऊसाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांच्या पदरी चार पैसे पडलेले आहे. अशा परस्थितीमध्ये याच बिलातून वीजबिल वसुली म्हणजे हे अन्यायकारक आहे. शिवाय राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीतच करता येत नाही. महावितरण मात्र, शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देताच विद्युत पुरवठा खंडीत करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. अशा परस्थितीमध्ये सुरळीत वीजपुरवठा झाला नाही तर शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होणार आहे. शिवाय ऊबिलातून वीजबिल वसुली झाली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता.

संबंधित बातम्या :

Cotton : शेतकऱ्यांना मिळाला पांढऱ्या सोन्याचा आधार, आता केवळ फरदड शिल्लक, जाणून घ्या कसा राहिला हंगाम!

स्वप्न सत्यामध्ये : शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ता, 1 किलोमीटरला 24 लाख रुपये

Grape : ज्याची भीती होती तेच झाले, आता द्राक्ष उत्पादकांसमोर एकच पर्याय, काय स्थिती आहे द्राक्षांच्या पंढरीत, वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.