Onion : नादच केलाय ग्रेट!! कांद्याचे एकरी उत्पन्न पाहून खुद्द कुलगुरूच पोहोचले बांधावर, अहमदनगरच्या शेतकऱ्याची Success Story

उत्पादन घटण्याची एक ना अनेक कारणे सांगितली जातात. निसर्गाचा लहरीपणा यातच कांद्याचे घटते दर यामुळे या नगदी पिकाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. पण अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याने असे काय करुन दाखवले आहे की, कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुनांही त्याचा हेवा वाटला आहे. राजुरी गावच्या पट्ट्याने एका एकरामध्ये तब्बल 25 टन म्हणजेच 250 क्विंटलचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे प्रतिकूल परस्थितीमध्येही काही अशक्य नाही हेच त्यांनी दाखवून दिले आहे.

Onion : नादच केलाय ग्रेट!! कांद्याचे एकरी उत्पन्न पाहून खुद्द कुलगुरूच पोहोचले बांधावर, अहमदनगरच्या शेतकऱ्याची Success Story
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याने एकरी 25 टन कांद्याचे उत्पादन घेतले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 4:12 PM

अहमदनगर: उत्पादन घटण्याची एक ना अनेक कारणे सांगितली जातात. निसर्गाचा लहरीपणा यातच (Onion Rate) कांद्याचे घटते दर यामुळे या नगदी पिकाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. पण (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याने असे काय करुन दाखवले आहे की, (Agricultural University) राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुनांही त्याचा हेवा वाटला आहे. राजुरी गावच्या पट्ट्याने एका एकरामध्ये तब्बल 25 टन म्हणजेच 250 क्विंटलचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे प्रतिकूल परस्थितीमध्येही काही अशक्य नाही हेच त्यांनी दाखवून दिले आहे.शेतकऱ्याच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी राहुरी विद्यापीठाचे कुलगुरु पी.जी. पाटील यांनी शेतकरी बि.टी. गोरे यांच्या शेत जवळ केले होते. एवढेच नाहीतर या प्रयोगाची राहुरी कृषी विद्यापीठानेही दखल घेतली असून हे तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जाणार आहे.

नियोजनाला तंत्रज्ञानाची जोड

शेती आहे म्हणून करण्याचा विषय राहिलेला नाही तर उत्पादन वाढीसाठी योग्य नियोजन आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर हा गरजेचा झाला आहे. राहाता तालुक्यातील राजुरी गावातील प्रयोगशील शेतकरी बि टी गोरे यांनी असेच केले आहे. त्यांनी एका एकरात बेड पद्धतीने जवळपास अडीच लाख कांद्याची रोपं लावली होती. यामध्ये विशिष्ट अंतर आणि पाण्याचे सुक्ष्म नियोजन केले होते. लागवडीच्या दरम्यानच पाण्याचे आणि औषध फवारणीचे वेळापत्रकच त्यांनी ठरवून घेतले होते. त्यामुळे एका एकरामध्ये 25 टन कांद्याची किमया झाली आहे.

कुलगुरुंच्या उपस्थितीमध्येच कांद्याची काढणी

राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु पी.जी. पाटील यांनी शेतकऱ्याच्या विक्रमी उत्पादनाबद्दल माहिती घेतली होती. बी.टी. गोरे हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी आतापर्यंत वेगवेगळे प्रयोग शेतामध्ये केले आहेत. पण विक्रमी कांदा उत्पादनाचा हे प्रयोग पाहण्यासाठी कुलगुरु थेट त्यांच्या बांधावर दाखल झाले होते. याच दरम्यान कांद्याची काढणी सुरु होती. शेती व्यवसयातील नियोजन किती महत्वाचे आहे हे गोरे यांच्या शेतीशिवारची पाहणी केल्यावर प्रत्येत शेतकऱ्यांच्या लक्षात येणार असल्याचे कुलगुरु यांनी सांगितले.

कृषी विद्यापीठाकडूनच दिली जाणार तंत्रज्ञानाची माहिती

नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. मात्र, बी.टी. गोरे यांनी केलेला कांदा उत्पादनाचा विक्रम अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातूनच या उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना समजावून सांगितले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही सुधारणा होणार असल्याचा विश्वास कुलगुरु पी.जी. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

Lemon Rate : सब गोलमाल..! उत्पादकांपेक्षा व्यापारीच मालामाल, काय आहे बांधावरची स्थिती?

Watermelon : कलिंगडला ‘विकेल ते पिकेल’ अभियानाचा आधार, शेतकऱ्यांनी कसा घ्यायचा लाभ? वाचा सविस्तर

Success Story : पानमळ्याने फुलले शेतकऱ्यांचे जीवन, 20 गुंठ्यामध्ये 10 कुटुंबाचा उदरनिर्वाह

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.