Latur Market: आठ दिवस सोयाबीनचे दर स्थिर राहिले अन् बाजार समितीमधले चित्रच बदलले, नेमके काय झाले?

खरीप हंगामातील तूर, कापूस आणि सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नजरा टिकून आहेत त्या सोयाबीनच्या दरावर. खरीप हंगामातील सोयाबीनची अजूनही निम्म्यापेक्षा अधिकची साठवणूक शेतकऱ्यांकडे आहे. त्यामुळे दर काय राहतात यावरच सर्वकाही अवलंबून असताना गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच वेगळेच चित्र पाहवयास मिळाले.

Latur Market: आठ दिवस सोयाबीनचे दर स्थिर राहिले अन् बाजार समितीमधले चित्रच बदलले, नेमके काय झाले?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक वाढली आहे.
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 2:16 PM

लातूर : (Kharif Season) खरीप हंगामातील तूर, कापूस आणि सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नजरा टिकून आहेत त्या सोयाबीनच्या दरावर. खरीप हंगामातील सोयाबीनची अजूनही निम्म्यापेक्षा अधिकची साठवणूक शेतकऱ्यांकडे आहे. त्यामुळे दर काय राहतात यावरच सर्वकाही अवलंबून असताना गुरुवारी (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच वेगळेच चित्र पाहवयास मिळाले. गेल्या आठ दिवसांपासून कापसाचे दर हे स्थिर असताना अचानक गुरुवारी विक्रमी आवक झाली आहे. शेतकऱ्यांनी आता साठवणूक केलेले (Soybean Rate) सोयाबीन विक्रीसाठी काढले आहे. शिवाय दरही अपेक्षेप्रमाणे नसला तरी सरासरीप्रमाणे आहे. त्यामुळेच हा बदल पाहवयास मिळत आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 25 हजार पोत्यांची आवक झाली होती तर 6 हजार 250 चा दर मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांध्ये समाधान आहे.

तुरीला हमीभावापेक्षा अधिकचा दर

राज्यात 1 जानेवारीपासून तूर हमीभाव केंद्र सुरु करण्यात आली आहेत. असे असतानाच तूरीच्या दरातही वाढ होण्यास सुरवात झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला तुरीला 5 हजार 600 रुपये दर मिळाला होता मात्र, खरेदी केंद्र सुरु होताच तुरीच्या दरात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. आता तुरीला लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार 500 चा दर मिळत आहे. खरेदी केंद्रावर 6 हजार 300 चा दर ठरवून देण्यात आला आहे. मात्र, कागदपत्रांची पूर्तता, विक्री करुनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास होत असलेला विलंब यामुळे शेतकरी थेट व्यापाऱ्यांकडेच तुरीची विक्री करीत आहेत. शिवाय हमी भाव केंद्र सुरु होताच बाजार पेठेत तुरीचे वाढल्याने व्यापाऱ्यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे. आता खरेदी केंद्र ओस पडली आहेत तर व्यापाऱ्यांकडील उलाढाल वाढलेली आहे.

आठ दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिरच

नववर्षाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात वाढ होण्यास सुरवात झाली. गत महिन्यात 5 हजार 800 वर असलेले सोयाबीन सध्या 6 हजार 500 रुपायांवर पोहचलेले आहे. दरामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण गेल्या आठ दिवासांपासून सोयाबीन हे 6 हजार 300 रुपयांवरच स्थिरावलेले आहे. त्यामुळे आठ दिवस दर वाढीची प्रतिक्षा करीत अखेर शेतकऱ्यांनी साठवणूकीतले सोयाबीन विक्रीसाठी बाहेर काढले आहे. समाधानकारक दर असल्यामुळे शेतकऱ्यांनी हे धाडस केलेले आहे.

शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला

शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली असली तरी आता टप्प्याटप्प्याने विक्री करणेही महत्वाचे आहे. कारण सध्याचे दर हे समाधानकारक आहेत. यंदा उन्हाळी सोयाबीन केवळ बिजोत्पादनासाठीच नाही उत्पादनाच्या अनुशंगाने घेतलेले आहे. उन्हाळी सोयाबीनचा विक्रमी पेरा यंदा झालेला आहे. शिवाय हे सोयाबीन सध्या फुलोऱ्यात असून उद्या याची आवक सुरु झाली तर दरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने का होईना विक्री करणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी tv9 मराठी डिजीटल शी बोलताना सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Corona : कोरोनाचा परिणाम कृषी विद्यापीठांवरही, काय आहेत राज्य शासनाचे आदेश?

Untimely Rain: अवकाळी, गारपिटीचा सर्वाधिक फटका विदर्भाला, काय सांगतो कृषी विभागाचा अहवाल?

Farmer: अवकाळीमुळे सर्वकाही व्यर्थ मात्र, चंद्रपुरात कृषी विभागाचा चक्रावून टाकणारा दावा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.