Chickpea Crop : ‘नाफेड’ चा उद्देश साध्य, शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून विक्रमी हरभरा खरेदी

हमीभावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालास किमान दर मिळावा हा सरकराचा उद्देश आहे. मात्र, या शासकीय धान्य खरेदीमध्ये देखील काही संस्थांची मक्तेदारी ही सुरु झाली होती. पण 'महाएफपीसी' ने पध्दत मोडीत काढत यंदा हरभऱ्याची विक्रमी खरेदी केली आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये 'महाएफपीसी' या उत्पादक कंपनीने तब्बल 12 लाख 50 हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी केली आहे.

Chickpea Crop : 'नाफेड' चा उद्देश साध्य, शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून विक्रमी हरभरा खरेदी
हरभरा खरेदी केंद्रImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 10:54 AM

पुणे : हमीभावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालास किमान दर मिळावा हा (Central Government) सरकराचा उद्देश आहे. मात्र, या शासकीय धान्य खरेदीमध्ये देखील काही संस्थांची मक्तेदारी ही सुरु झाली होती. पण ‘महाएफपीसी’ ने पध्दत मोडीत काढत यंदा (Chickpea Crop) हरभऱ्याची विक्रमी खरेदी केली आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये ‘महाएफपीसी’ या (FPC) उत्पादक कंपनीने तब्बल 12 लाख 50 हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी केली आहे. त्यामुळे नाफेडकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. येथील चोख व्यवहारामुळे शेतकरी आता खरेदी केंद्राकडे शेतीमाल घेऊन येत आहेत. ‘महाएफपीसी’ने गावतळावर खरेदी केंद्र उभारली आणि वेळेत शेतकऱ्यांचे बील अदा केल्यामुळे हा बदल घडून आला आहे. या माध्यमातून शेती उत्पादक कंपन्या म्हणजे मिनी मार्केट हा सरकारचा उद्देश साध्य होताना दिसत आहे.

नाफेडच्या भूमिकेमुळे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी

नाफेडच्या माध्यमातून काही मोजक्याच कंपन्या ह्या शेतीमालाची खरेदी करीत होत्या. मात्र, यामध्ये नियमितता आणि अधिक माल खरेदी करुन घेण्यासाठीचे प्रयत्न दिसून येत नसल्याने नाफेड महाफार्मर प्रोड्यूसर कंपनीला हरभरा खरेदीचे काम दिले होते. त्यानुसार गावपातळीवर खरेदी केंद्र उभारुन शेती उत्पादक कंपन्यांनी हरभऱ्याची खरेदी केली आहे. यामुळे नाफेडच्या आवकमध्ये वाढ झाली शिवाय शेतकऱ्यांनाही वेळेत मालाचे पैसे मिळाले. त्यामुळे नाफेडचा उद्देश साध्य झाला आहे.

20 जिल्ह्यांमध्ये 288 खरेदी केंद्र

‘महाएफपीसी’ने कोणचे क्षेत्र मर्यादा ठेवली नाही. राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये तब्बल 288 खरेदी केंद्र उभारली होती. शिवाय येथील हरभरा खरेदीची माहिती शेतकऱ्यांना देऊन ही प्रक्रीया काय आहे याचा प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी ही वाढतच गेली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे हरभरा खरेदी केला जात आहे. आतापर्यंत 66 हजार 275 शेतकऱ्यांचा तब्बल 12 लाख 50 हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यामध्ये यश मिळाले आहे.

शेतकऱ्यांना वेळेत बील अन् सेवाही

शासकीय धान खरेदीमध्ये ‘एफपीओ’ चा समावेश झाल्यापासून चित्र बदलत आहे. यापूर्वी खरेदी केंद्रावर शेतीमालाची विक्री तर होते पण वेळेत बील अदा केले जात नसल्याच्या तक्रारी होत्या. पण आता 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैस मिळत आहेत. शिवाय ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढत आहे. शासनाच्या एकूण हरभरा खरेदीपैकी 60 हरभरा हा ‘एफपीसी’ अर्थात फार्म प्रोड्यूसर कंपनीने खरेदी केला आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्याचा कारभार तर वाढला आहे पण शेतकऱ्यांचीही सोय झाली आहे.

संबंधित बातम्या :

Amravati : सोयाबीन बहरुनही उत्पादन घटण्याचा धोका, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकरी हवालदिल

Solapur : दुष्काळात तेरावा, बोगस बियाणांमुळे 4 एकरावर बहरलेल्या सोयाबीनवर फिरवला रोटर

Cotton Crop : यंदाही कापसाची झळाळी कायम राहणार, खरिपात क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.