Akola : मका पिकाने शेतकऱ्यांना भरभरुन दिले, मुख्य पिकांतून नाहीपण हंगामी पिकातून शेतकऱ्यांचे साधले

शेतीमालाचे दर हे उत्पादनावर आधारित असतात. उत्पादनात घट झाली की दरात वाढ आणि मागणीपेक्षा अधिक उत्पादन झाले तर दरात घट ही ठरलेलीच आहे. गेल्या काही वर्षांपासून मका पिकाला किमान हमीभाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होते. यंदा मात्र, परस्थिती बदलत आहे. घटत्या उत्पादनामुळे प्रथमच मक्याला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळाला आहे. अकोला जिल्ह्यातील मलकापूर ही मका पिकाची मुख्य बाजारपेठ आहे. वाढत्या मागणीमुळे हा विक्रमी दर मिळाला आहे.

Akola : मका पिकाने शेतकऱ्यांना भरभरुन दिले, मुख्य पिकांतून नाहीपण हंगामी पिकातून शेतकऱ्यांचे साधले
मकाची आवक घटल्याने यंदा विक्रमी दर मिळत आहे.
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 2:40 PM

अकोला :  (Agricultural prices) शेतीमालाचे दर हे उत्पादनावर आधारित असतात. उत्पादनात घट झाली की दरात वाढ आणि मागणीपेक्षा अधिक उत्पादन झाले तर दरात घट ही ठरलेलीच आहे. गेल्या काही वर्षांपासून (Maize Crop) मका पिकाला किमान (Guarantee Rate) हमीभाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होते. यंदा मात्र, परस्थिती बदलत आहे. घटत्या उत्पादनामुळे प्रथमच मक्याला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळाला आहे. अकोला जिल्ह्यातील मलकापूर ही मका पिकाची मुख्य बाजारपेठ आहे. वाढत्या मागणीमुळे हा विक्रमी दर मिळाला आहे. सध्या मक्याला 2 हजार 165 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. तर यंदाच्या हंगामात 1 लाख 88 हजार क्विंटल मक्याची आवक झाली आहे.

मोजक्याच शेतकऱ्यांना फायदा

दरवर्षी मक्याच्या दरात घट हा ठरलेलीच होती. केवळ चारा पीक म्हणून मकाची लागवड केली जात होती. अशा या प्रतिकूल परस्थितीमुळे यंदा मका लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट झाली होती तर दुसरीकडे पोषक वातावरणामुळे उत्पादनात भर पडली. मात्र, मुळातच क्षेत्र घटल्याने आवकवर त्याचा परिणाम झाला आहे. आवक घटल्याने मलकापूर बाजार समितीमध्ये मकाला 2 हजार 165 असा दर मिळाला आहे. पण या विक्रमी दराचा फायदा हा मोजक्याच शेतकऱ्यांनाच झालेला आहे. मकासाठी नाफेडने 1 हजार 830 असा दर ठरवून देण्यात आला असला तरी आता 2 हजारांपेक्षा अधिकचा दर मिळत आहे.

लष्करी अळीमुळे घटले क्षेत्र

वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीपिकावर होतो. शिवाय गेल्या तीन वर्षापासून हा बदल शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. मलकापूर तालुक्यात मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात होती. पण गेल्या काही वर्षांपासून या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने त्रासलेल्या शेतकऱ्यांनी अखेर पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. त्यामुळे क्षेत्र घटले असले तरी विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

यंदा प्रथमच मकाला विक्रमी दर

मका पिकाचा दुहेरी फायदा होतो म्हणून शेतकऱ्यांचा यावर भर असतो. पण वातावरणातील बदलामुळे या पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळे उत्पादन क्षेत्र घटले. त्यामुळेच यंदा 2 हजार 165 असा विक्रमी दर मिळाला आहे. दरवर्षी किमान हमीभावाप्रमाणे का होईना मक्याची खरेदी करावी अशी मागणी असते. पण यंदा शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा अधिकचा दर मिळाला आहे.तर दुसरीकडे चारा पीक म्हणूनही याचा वापर होत आहे.

संबंधित बातम्या :

Cotton : कापसाचे उत्पादन घ्या, पण फरदडमुळे होणारे नुकसान टाळा, ‘फरदड मुक्त गाव’ मोहिमेत कृषी विभाग बांधावर

Thane: माणुसकी जिवंत आहे, हे सिद्ध करणारी घटना! गरोदर असलेल्या जखमी गाईचं संवेदनशील कुटुंबाकडून बाळंतपण

Weather Update : राज्यात ऊन-पावसाचा खेळ, आणखी पाच दिवस धोक्याचेच…! काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.